Numerology Today 7 November 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1: तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा
मूलांक 1 च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. पैसा आज कुठेतरी अडकू शकतो, त्यामुळे हुशारीने गुंतवणूक करा. आज तुमचे कुटुंबीयांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. परंतु आज तुम्ही तुमचा निर्णय पुढे ढकलला पाहिजे, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. नोकरदार लोकांनी आज कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं.
मूलांक 2: अपूर्ण कामं पूर्ण होतील
मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. पैसे येण्याची शक्यता आहे आणि अपूर्ण कामंही पूर्ण होतील. कुटुंबासह घरातील दिवाळीच्या सजावटीवर लक्ष केंद्रित कराल आणि थोडी खरेदीही कराल. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद सुरू असतील तर ते आज मिटतील. आईच्या बाजूने चांगले लाभ मिळतील आणि नातेसंबंधही मजबूत राहतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ राहील.
मूलांक 3: व्यवसायात प्रगती होईल
3 मुलांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुमचं सकारात्मक वर्तन तुमचं बिघडलेलं काम सुधारण्यास उपयुक्त ठरेल. कमाईचे स्त्रोत वाढतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज व्यवसाय वाढीसाठी काही नवीन मार्ग उघडताना दिसत आहेत, ज्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदात दिवस घालवाल. उच्च शिक्षणासाठी आज परदेशात जाण्याची शक्यता आहे.
मूलांक 4: पैशांचा ओघ वाढण्याची शक्यता
मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस अनुकूल असेल, व्यवसाय वाढीसाठी नवीन मार्ग खुले होतील, ज्यामुळे तुम्हाला पैशांचा ओघ वाढण्याची शक्यता असेल. आज तुम्ही एखाद्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊन पैसे गुंतवले तर तुम्हाला भरपूर नफा मिळेल. आज तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने वागणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मूलांक 5: रागावू नका
मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. जर तुम्ही कर्जासाठी अर्ज केला असेल तर तो आज नाकारला जाऊ शकतो, ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध आज बिघडू शकतात, त्यामुळे आज तुमच्यासाठी सल्ला आहे की शांत राहा आणि रागावू नका.
मूलांक 6: चांगले परिणाम मिळतील
मूलांक 6 च्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुम्हाला अचानक काही पैसे मिळू शकतात, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस चांगला आहे, आज तुम्ही एखाद्यासोबत भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता, जे तुम्हाला भविष्यात चांगले परिणाम देईल. नोकरदार लोक त्यांच्या नोकरीत काही नवीन बदल करण्याचा विचार करू शकतात. आज तुमचा कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
मूलांक 7: दिवस मध्यम फलदायी राहील
मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. अहंकारी बनून तुम्ही करत असलेलं काम खराब करू शकता, ज्यामुळे तुम्ही आतून अस्वस्थ राहू शकता. नोकरदार लोकांसाठी, आज कामाच्या ठिकाणी तुमचं नाव आणि काम या दोघांचंही खूप कौतुक होईल, त्यामुळे आज तुमचं नाव प्रसिद्ध होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचाही बेत आखू शकता.
मूलांक 8: विवेकबुद्धीची प्रशंसा केली जाईल
मूलांक क्रमांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असेल. आज तुमची तब्येत थोडी खराब असू शकते, ज्यामुळे तुम्हाला कामात अडचणी येऊ शकतात. नोकरदार लोकांची आज कामाच्या ठिकाणी त्यांच्या शहाणपणाची आणि समजूतदारपणाची प्रशंसा होईल. आज तुम्ही एकटं राहणं पसंत कराल आणि कोणाशीही जास्त संवाद साधू नका. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस तणावपूर्ण असू शकतो, त्यामुळे आज तुमच्या जोडीदाराशी प्रेमाने वागा, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मूलांक 9: आनंद आणि शांती राहील
आज 9 मूलांक असणाऱ्यांना भाग्य साथ देईल. आज तुम्ही तुमच्या सर्व समस्या अतिशय हुशारीने सोडवाल. जर तुम्ही एखाद्यासोबत भागीदारीत काम करत असाल, मग तो तुमचा भाऊ असो वा मित्र, तुम्ही त्यांच्याशी अगदी स्पष्टपणे बोलाल, तर ते तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या भावांसोबत काही नवीन योजना देखील बनवू शकता. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील, सुख-शांती नांदेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: