Shani Margi: ज्योतिषशास्त्रात शनि (Shani) ग्रह हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावकारी मानला जातो. शनिदेवाला कर्म आणि न्यायाचा ग्रह- म्हणजेच न्यायदेवता मानलं जातं, तो लोकांना त्यांच्या कर्माच्या आधारे फळ देतो. शनि राजाला दरिद्री आणि गरीबांना राजा बनवू शकतो. शनीची राशी शुभ असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. त्याला प्रत्येक कामात यश मिळतं. तर शनिची अशुभ स्थिती अत्यंत क्लेशदायक मानली जाते. आज 4 नोव्हेंबरला शनि थेट कुंभ राशीत मार्गी (Shani Margi 2023) झाला आहे, यामुळे काही राशींना प्रचंड लाभ होणार आहे.


शनिचा त्रास होणार कमी


शनि देवाने 4 नोव्हेंबरला आपली चाल बदलली आहे. शनिदेव सरळ चालीत असल्यामुळे अनेक राशींची संकटं कमी होणार आहेत. शनिदेव थेट मार्गस्थ होत असल्याने काही राशींचं नशीब चमकणार आहे. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे आणि त्यांचं भाग्य उजळणार आहे.


वृषभ (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिची प्रत्यक्ष स्थिती खूप फायदेशीर ठरणार आहे. आजपासून तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा होईल. या राशीचे लोक त्यांच्या नोकरीत खूप प्रगती करतील. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळेल. शनिचं प्रत्यक्ष असणं शुभ तर आहेच, पण व्यावसायिकांसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यावसायिकांना परदेशातून उत्पन्नाच्या नवीन संधी मिळू शकतात. 


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिचं प्रत्यक्ष मार्गी होणं लाभदायक ठरणार आहे. तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात शनिच्या सरळ चालीने होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुम्ही जमीन किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. जे काम कराल त्यात यश मिळेल. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. तुम्हाला परदेशातही करिअर करण्याची संधी मिळू शकते.


सिंह (Leo)


शनि देव मार्गी झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या राशीचे लोक जे बिझनेसमध्ये गुंतलेले आहेत ते मोठी डील फायनल करू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. शनिची कृपा असल्यामुळे नोकरीत बढती, बदली सारखे लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे जुने अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात.


कुंभ (Aquarius)


शनिदेव सध्या कुंभ राशीत असून आज या राशीत थेट भ्रमण करत आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांचं नशीब उजळणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात शनिदेव खूप प्रगती करून देणार आहे. तुमच्यासाठी आर्थिक लाभाच्या अनेक अनपेक्षित संधी खुल्या होतील. प्रगतीचीही दाट शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. या काळात तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते यशस्वी होतील. तुमची सर्व प्रलंबित आणि अडकलेली कामं पूर्ण होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology: खूप महत्वाकांक्षी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ठरवलं ते साध्य करुनच राहतात