Shani Jayanti 2025: हिंदू धर्मात शनि जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. या प्रसंगी, कर्माचे फळ देणारे शनिदेव यांची पूजा केली जाते. यासोबतच,  धार्मिक मान्येतनुसार, शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात अपेक्षित यश मिळते आणि सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर होतात. ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष स्थान देण्यात आले आहे. शनि हा न्यायाधीश आहे, तो कर्मानुसार फळ देतो. शनिदेवाची जयंती 27 मे रोजी आहे. या वर्षी शनि जयंती 27 मे 2025, मंगळवार रोजी आहे. या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता. यावेळी शनि जयंती खूप खास आहे कारण शनि जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत.

शनि जयंतीनिमित्त शुभ योगांचे दुर्मिळ संयोजन

कृतिका नक्षत्र, रोहिणी नक्षत्र आणि सुकर्म योग यांचा संयोग होणार आहे. तसेच, सूर्य आणि बुध एकत्रितपणे बुधादित्य योग निर्माण करत आहेत. याशिवाय द्विपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योगही तयार होतील. हे शुभ योग एकत्रितपणे 4 राशींवर धनाचा वर्षाव करतील.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात शनि जयंती आनंद घेऊन येईल. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत उंची गाठाल. तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढीची चांगली बातमी मिळेल. पैसे गुंतवल्याने नफा होईल. तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनाही शनि जयंतीचा फायदा होईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. नफा वाढेल.

मकर

मकर राशीच्या लोकांना शनि जयंती अनेक फायदे देईल. तुम्हाला आर्थिक प्रगती मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. पैसे कमविण्याचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. आयुष्यात आनंद येईल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना भाग्य लाभेल. प्रलंबित पैसे मिळाल्याने तुमचे बिघडणारे बजेट नियंत्रणात येईल. काम कधीतरी पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी कामगिरी सुधारेल.

हेही वाचा :

Gajkesari Yog 2025: 28 मे पासून 'या' 5 राशींनी टेन्शन विसरा! मिथुन राशीत बनतोय जबरदस्त गजकेसरी योग, पैशाचा पाऊस, श्रीमंतीचे योग 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)