Shani Jayanti 2024 : पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीला शनीचा (Lord Shani) जन्म झाला होता. म्हणून या दिवसाला शनी जयंतीच्या (Shani Jayanti) नावाने ओळखलं जातं. या दिवशी शनीची (Shani Dev) पूजा केल्याने शुभ फळ मिळते असं म्हणतात. यंदा 6 जूनला शनी जयंती आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शनीला कर्मफळदाता म्हणतात. तो प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी अशुभ परिणामांपासून जर दूर राहायचं असेल तर शनीची विधीवत पूजा करणं गरजेचं आहे.
शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळू गतीने चालणारा ग्रह आहे. शनीच्या अशुभ परिणामांमुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं म्हणतात. यावेळी मीन राशीत शनीच्या साडेसातीचा पहिला प्रभाव सुरु आहे. तर, वृश्चिक आणि कर्क राशीवर शनीची ढैय्या सुरु आहे. जर एखाद्या राशीवर किंवा व्यक्तीवर शनीची साडेसाती किंवा ढैय्या आली की त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
असं म्हणतात की, शनीच्या साडेसातीचं पहिलं चरण हे सर्वात जास्त भयानक असतं. या काळात व्यक्तीला आपली सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे शनीला प्रसन्न करण्यासाठी नेमके काय उपाय करावेत ते जाणून घ्या.
'अशी' करा शनीची पूजा
शनी जयंतीच्या दिवशी शनीला प्रसन्न करण्यासाठी पहाटे लवकर उठून स्नान करा. तसेच, घराच्या देव्हाऱ्यात दिवा लावा. या दिवशी तुमच्या आसपास असणाऱ्या शनीच्या मंदिराला भेट द्या. शनीला तेल आणि पुष्प अर्पण करा. तसेच, शनी चालीसाच्या पाठाचं पठण करा. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी उपवास देखील करा. शनी जयंतीच्या दिवशी दानसुद्धा करा. धार्मिक मान्यतेनुसार, शनी जयंतीच्या दिवशी दान केल्याने अनेक दोषांपासून मुक्ती मिळते.
'या' मंत्रांचा जप करा
"ऊं शं अभयहस्ताय नम:"
"ऊं शं शनैश्चराय नम:"
"ऊं नीलांजनसमाभामसं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्त्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम"
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: