शनिदेवाची पूजा केल्याने  तुमच्या आयुष्यातील समस्या संपतील. काही सोपे उपाय केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे हे उपाय केल्याने तुम्ही संकटातून देखील बाहेर पडू शकता.  शनिवार हा शनिदेवाचा वार आहे.  या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात. शुभ कर्म करणाऱ्या व्यक्तीला शनि शुभ फळ देतो. तर, वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षा होते. शनिदेवाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. काही सोपे उपाय केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. जाणून घेऊयात कोणते उपाय केल्यावर शनिची होईल कृपादृष्टी 



  • जर शनिदेवाची वक्रदृष्टी पडली  असेल तर व्यक्तीने दोन्ही जेवणात काळे मीठ आणि काळी मिरी वापरावी.

  • शनिवारी माकडांना भाजलेले हरभरे खाऊ घालणे फायदेशीर आहे. यासोबतच गोड भाकरीला तेल लावून काळ्या कुत्र्याला दिल्याने शनी देवाच्या वक्रदृष्टीपासून रक्षण होते. 

  • शनीची अशुभ दशा चालू असेल तर शनिवारी मांस आणि मद्य सेवन करू नये. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज पूजा करताना महामृत्युंजय मंत्र ओम नमः शिवाय जप करा.

  • लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल भरून त्यात तांब्याचे नाणे  टाका आणि  घराच्या अंधाऱ्या भागात ठेवा. यामुळे शनीची कृपादृष्टी होईल

  • जर शनीची साडेसाती सुरु असेल तर  800 ग्रॅम काळे तीळ शुक्रवारी रात्री पाण्यात भिजवावे आणि ते बारीक करून 8 लाडू बनवा आणि शनिवारी सकाळी गूळ मिसळून काळ्या घोड्याला खाऊ घाला. आठ शनिवार हा प्रयोग केल्याने शनीची कृपा राहते.  

  • शनिदेवाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी शनिवारी काळ्या गाईची सेवा करावी. यासाठी तिला चपाती खायला दया. लाडू खाऊ घाला आणि नमस्कार करा 

  • दर शनिवारी वड किंवा पिंपळाच्या झाडाखाली सूर्योदयापूर्वी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून कच्चे दूध आणि उदबत्ती अर्पण करा. शनिवारी आपल्या हातात काळा धागा बांधा

  • जर तुम्हाला शनिदेवाची साडेसाती असेल तर शनिवारी अंधार पडल्यानंतर पिंपळाच्या झाडाला  साखरेचे  पाणी अर्पण करा. यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावा, त्यानंतर तिथे बसून हनुमान, भैरव आणि शनि चालिसाचे पठण करा. यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न होतात.
     


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)