Astrology Panchang yog 9 December 2024 : आज 9 डिसेंबरचा म्हणजेच सोमवारचा दिवस आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी आहे. आजच्या दिवशी रवि योग (Yog), सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, दिवसभरात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात चांगला आनंद मिळेल. तसेच, तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत चालेल. आज तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमच्या बौद्धिक क्षमतेत चांगली वाढ दिसून येईल. तसेच, मुलांसाठी देखील आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज नोकरदार वर्गातील लोकांचं तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाऊ शकतं.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आज चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, नोकरदार आणि व्यावसायिकांना आज चांगला लाभ मिळेल. तुमचा दिवस आज प्रसन्न जाईल. जे सिंगल लोक आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज दिवसभरात तुमच्याकडून एखादी गोष्ट सकारात्मक घडेल. यासाठी तुमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास असण्याची गरज आहे. आज तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, समाजात मान-सन्मान वाढलेला दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत चांगली वाढ दिसून येईल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जर तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भविष्यात तुम्हाला यातून चांगला लाभ मिळणार आहे. आरोग्य देखील चांगलं असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: