Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. त्याचप्रमाणे, शनिवारचा दिवस हा न्यायदेवता शनीदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. या दिवशी शनीची (Lord Shani) पूजा केली जाते. त्याचबरोबर शनीची सदैव कृपा राहावी यासाठी उपवास देखील केला जातो.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. नवीन वर्षाच्या म्हणजेच 2025 च्या मार्च महिन्यात शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा सर्व 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळेल, तर व्यवसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. त्याचबरोबर, तुमची मानसिक आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांवर या काळात भगवान हनुमानाची चांगली कृपा असणार आहे. तुमची सर्व बिघडलेली कामे या काळात सुरळीत होतील. तसेच, तुमच्या करिअरला एक वेगळा मार्ग मिळेल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. तुमच्या कुटुंबात आनंद राहील. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या काळात शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना चांगली नोकरी लवकरच मिळेल. तुम्हाला चांगल्या मित्रांची साथ लाभेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: