Astrology Panchang 11 January 2025 : आज शनिवारी, 11 जानेवारी रोजी चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच आज पौष शुक्ल पक्षातील द्वादशीला प्रदोष व्रताचा शुभ संयोग होत आहे. याशिवाय आज रोहिणीनंतर मृगाशिरा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष (Aries Horoscope Today)
शनिदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार लाभदायक राहील. मेष राशीवर शनिदेवाची नजर असेल, त्यामुळे त्यांना सर्व गोष्टीत पुरेपूर लाभ मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात त्यांना प्रवासाचा लाभ मिळेल. व्यवसायात तुम्ही सहकाऱ्यांशी समन्वय राखाल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. टूर आणि ट्रॅव्हल व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आज पैसे कमवण्याच्या संधी मिळत राहतील. आज पैसे वाचवण्यात आणि बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार भाग्याचा असेल. जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळेल. तुम्ही आज बँकेशी संबंधित अडलेलं कामही पूर्ण करू शकता. आर्थिक बाबतीत तुमची स्थिती चांगली राहील. एखाद्या मित्राची किंवा नातेवाईकाची मदत केल्याने तुम्हाला आनंद वाटेल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने फायदा होऊ शकतो. जे लोक आयात-निर्यात क्षेत्रात काम करतात त्यांना नशिबाची साथ मिळेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
सध्या कर्क राशीवर शनीचा प्रभाव फिरत आहे. पण आज शनि आणि चंद्र यांच्यामध्ये चतुर्थ दशम योग तयार होत आहे, त्यामुळे कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. ज्यांना कार खरेदी करायची आहे त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळू शकतं. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ घालवण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. विज्ञान आणि अभियांत्रिकी कार्याशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत पार्टी आणि मौजमजा करता आल्याने मन प्रसन्न राहील.
तूळ (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील. आज त्यांना व्यावसायातून भरपूर नफा मिळेल. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. संशोधन आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना त्यांच्या मेहनतीचा पुरेपूर लाभ मिळेल. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मिळून काही काम सुरू केलं तर तुम्हाला त्याचे दीर्घकालीन लाभ मिळतील. ज्यांना शैक्षणिक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांना यश मिळेल. सकारात्मक विचार ठेवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
तुम्ही सुरू केलेल्या कामात तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळतील. आजचा दिवस तुमचाच आहे आणि आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीचं नियोजन देखील करू शकता. तुम्हाला उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांकडून लाभ मिळू शकतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमची क्षमता आणि कौशल्याने तुमच्या अधिकाऱ्यांना खूश करू शकाल आणि तुमची प्रशंसाही होईल. प्रत्येक कामात तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: