Shani Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला क्रूर ग्रह म्हटले आहे. कारण शनी स्वभावाने क्रूर आणि न्यायी असतो असे म्हटले जाते. या शिवाय शनिला कर्माचा दाता देखील म्हटले जाते. शनिदेव दुष्कर्म, गुन्हेगार, धैय्या आणि साडेसातीच्या लोकांना त्रास देतात. पंचांगानुसार, शनि 17 जानेवारी 2023 रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर मार्च 2025 पर्यंत या म्हणजे 26 महिने याच राशीत राहील.
कुंभ राशीत शनिचे संक्रमण होताच शनीच्या या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पडेल. तसेच काही राशी शनीच्या साडेसाती आणि धैय्यापासून मुक्त राहतील. शनीच्या संक्रमणामुळे 2023 ते 2025 हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात कठीण काळ असेल. यासह कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांनाही शनिदेवाचा त्रास होईल.
कुंभ : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि प्रत्येक राशीत अडीच वर्षात भ्रमण करतो . 17 जानेवारीला जेव्हा शनि कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा कुंभ राशीला साडेसातीचा सर्वात क्लेशदायक दुसरा टप्पा सुरू होईल. मार्च 2025 पर्यंत इथे राहून शनि तुम्हाला त्रास देत राहील. यानंतर साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल. कुंभ राशीचे लोक 23 फेब्रुवारी 2028 रोजी साडेसातीपासून मुक्त होतील. दुसरीकडे मार्च 2025 पर्यंत या लोकांनी पैसा, आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पैशाचे व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करावेत.
मकर : कुंभ राशीत शनीचे संक्रमण असल्याने मकर राशीसाठी साडेसातीचा तिसरा चरण सुरू होईल. या काळात मकर राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी. मार्च 2029 नंतर त्याचे शुभ दिवस सुरू होतील.
मीन : कुंभ राशीत शनीच्या संक्रमणाने मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होईल. साडेसात वर्षे शनीची वाईट नजर त्यांच्यावर राहील. शनिदेवाची वाईट नजर टाळण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करावेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या