Saturday Remedies : जर शनिदेव (Shani Dev) चांगल्या कर्मांचं चांगलं फळ देत असतील तर ते वाईट कर्मांची शिक्षा देण्यास देखील मागेपुढे पाहत नाही. शनि क्रोधित झाला तर जीवनात वाईट घटना घडू लागतात, व्यक्तीला समस्यांनी घेरलं जातं.
तुमच्यासोबतही अशा काही घटना घडत असतील किंवा तुमचं काही नुकसान होत असेल, तर तुमच्यामागे शनीची साडेसाती असल्याचे संकेत मिळतात. शनि नाराज असल्यावर अघटित घटना घडतात. अशा वेळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही विविध उपाय करू शकतात. शनीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शनिवारी काही उपाय केले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला शनिदोषापासून देखील मुक्ती मिळेल. हे उपाय नेमके कोणते? जाणून घेऊया.
शनिदोषाचे उपाय (Shani Dosh Remedies)
- शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, नंतर झाडाला जल अर्पण करा, जल अर्पण करताना पिंपळाच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनिदोषापासून आराम मिळतो.
- शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी दररोज शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा. दररोज शनि चालिसाचा पाठ केल्यास विशेष लाभ होतो.
- शनिदेवासह हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. कुंडलीतून शनि दोष दूर करण्यासाठी हनुमानजींची पूजा करावी.
- शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी काळे तीळ, काळी छत्री, मोहरीचे तेल, काळे उडीद आणि जोडे, चप्पल यांचं दान करावं, यामुळे जीवनातील शनिदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो.
- शनिवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा पठण करणं खूप शुभ असतं, यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते. त्याच्या कृपेने सर्व संकटं दूर होतात. या दिवशी सूर्यास्तानंतर हनुमानजींची पूजा करावी.
- शनिदेवाच्या पूजेमध्ये सिंदूर, मोहरी किंवा काळ्या तिळाचं तेल वापरावं. या दिवशी शनिदेवाला तेलाचा दिवा लावून निळी फुलं अर्पण करून त्यांची पूजा करावी.
- शनिवारी काळ्या गाईची सेवा केल्यानेही शनिदोष दूर होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: