Shash Mahapurush Rajyog : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) कर्म आणि न्यायाचा कारक मानलं जातं. शनिदेव हा संथ गतीने आपली स्थिती बदलतो, तो एका राशीत अडीच वर्ष विराजमान असतो. सध्या शनिदेव आपल्या स्वत:च्या घरी, म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. येत्या मार्च महिन्यात कुंभ राशीतच शनीचा उदय होईल आणि शनि ‘शश महापुरुष राजयोग’ निर्माण करेल, ज्यामुळे 3 राशींचं नशीब पालटणार आहे.


शश महापुरुष राजयोगामुळे 3 राशींना आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची दाट शक्यता आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. शश महापुरुष राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत, जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशींच्या लोकांसाठी शश महापुरुष राजयोग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारेल. यावेळी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकतो. करिअरच्या बाबतीत या वेळी तुम्हाला कुठूनतरी चांगली बातमी मिळू शकते. तुमची अनेक रखडलेली कामे पुन्हा रुळावर येतील. अचानक धनलाभ होऊ शकतो.


मिथुन रास (Gemini)


या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे.  तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला उच्च पद आणि मोठा पगार मिळण्याची शक्यता आहे. अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात. व्यवसायासाठी हा काळ प्रगती घेऊन येणारा ठरु शकतो. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे.  तांत्रिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे.


तूळ रास (Libra)


शश महापुरुष राजयोगामुळे तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.  तुमचे वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. शनिदेवाच्या कृपेने कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. मोठे पद आणि मान-सन्मानात वाढ होऊ शकते. अविवाहित लोकांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. तुमची राहणी आणि बोलण्याची पद्धत इतरांना आकर्षित करेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : शनिदेव तुम्हाला कधी करेल लखपती? फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात