Shani Dev : 2024 हे शनीचं वर्ष आहे. अंकशास्त्रानुसार, शनीचा (Shani Dev) क्रमांक 8 मानला गेला आहे. शनी (Lord Shani) ज्याप्रमाणे एखाद्यावर साडेसाती आणू शकतो त्याचप्रमाणे तो एखाद्याचं आयुष्य राजासारखं बदलूही शकतो. त्यानुसार, 2024 हे चालू वर्ष काही जन्मतारखेच्या लोकांसाठी फार लाभदायक असणार आहे. चला तर जाणून घेऊयात पुढचे 202 दिवस शनीचं हे वर्ष कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी भाग्याचं ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 


मूलांक 7 


कोणत्याही महिन्याच्या 7,16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. ज्यांचा मूलांक 7 आहे अशा लोकांसाठी पुढचे 202 दिवस अगदी सुखाचे जाणार आहेत. या दम्यान तुमची काही कामे थांबली असतील तर ती पूर्ण होतील. तसेच, जे लोक सिंगल आहेत ते रिलेशनशिपमध्ये येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नका. तुमच्या करिअरमध्ये थोडेफर चढ-उतार असतील. 


मूलांक 6 


कोणत्याही महिलेच्या 6,15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी पुढचे काही दिवस चांगले असतील. तुम्हाला करिअरमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. तसेच, मित्रांच्या साहाय्याने तुमची कामे पूर्ण होतील. स्वत:वर प्रेम करायला शिका. 


मूलांक 8 


मूलांक 8 म्हणजे कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. त्यानुसार पुढचे काही दिवस तुमच्यासाठी लाभाचे असणार आहेत. जर तुम्हाला एखद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच गोड बातमी मिळेल. तुमची तब्येत अगदी ठणठणीत असमार आहे. 


मूलांक 5 


कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या जन्मतारखेचे लोक पुढचे काही दिवस फार लकी असणार आहेत. काही कारणास्तव तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 13 June 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या