Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची (Shani Dev) चाल एखाद्या व्यक्तीवर पडली की त्या व्यक्तीचं नशीब बदलतं असं म्हणतात. तुमच्या कुंडलीत जर शनीची (Lord Shani) स्थिती मजबूत असेल तर गरीब व्यक्तीलाही राजा बनवण्याची ताकद शनीत असते. येत्या पाच महिन्यांत शनी कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तर, 29 जूनला शनीची वक्री चाल असणार आहे. शनीची (Saturn) प्रतिगामी गती 15 नोव्हेंबरपर्यंत राहणारआहे. कुंभ राशीत बसलेला शनी प्रतिगामी असल्यामुळे कोणत्या राशींचं भाग्य उजळणार ते जाणून घेऊयात. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


येणाऱ्या 5 महिन्यांपर्यंत कुंभ राशीत विराजमान असलेला शनी वृश्चिक राशीसाठी फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांना चांगले गुंतवणूकदार मिळतील. तसेच, तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक चढ-उतार तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही संवाद साधून हे वाद मिटवू शकतात. 


तूळ रास (Libra Horoscope)


शनीची चाल येणाऱ्या पाच महिन्यापर्यंत तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमची अनेक कामं सहज साध्य होतील. समाजात तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होईल. तसेच, पैशांच्या बाबतीत व्यवहार करताना जरा जपून करा. गुंतवणुकीसाठी तुम्हाला नवीन मार्ग खुले होतील. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या पाच महिन्यांत शनीमुळे तुमच्या आयुष्यात 
चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. तसेच, तुमच्या तब्येतीत चढ-उतार पाहायला मिळतील. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. 


'या' राशींवर असणार शनीची करडी नजर 


शनीच्या वक्री चाल ज्या राशींवर पडते त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोत. त्यानुसार, 4 राशींच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. यामध्ये मीन रास, मकर रास, कुंभ रास आणि मेष राशीचा समावेश आहे. शनीच्या वक्री चालीने या राशींना फार आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या राशींच्या लोकांना आर्थिक पैशांची चणचण जाणवू शकते. तसेच आरोग्यावर देखील याचा वाईट परिणाम होऊ शकतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कुंभसह 'या' 5 राशींचं नशीब पालटणार, होणार लाभच लाभ