Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात आश्चर्यचकित करणारा ग्रह आहे. शनीची वक्री (Shani Dev) चाल कधी राशींना शुभ परिणाम देते तर कधी अशुभ परिणामांचा सामना करावा लागतो. एका ठरविक कालावधीनंतर शनी उदय, अस्त, मार्गक्रमण आणि वक्री होतो. सध्या शनी कुंभ राशीत आहे. 30 जूननंतर शनी वक्री चाल करणार आहे. शनीची (Lord Shani) ही उलटी चाल 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. शनीच्या या वक्री चालीमुळे कोणत्या राशींचं (Zodiac Sign) भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
शनीची चाल पुढच्या पाच महिन्यांसाठी तूळ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी असणार आहे. शनीच्या शुभ प्रभावांमुळे या राशीच्या लोकांना अनेक शुभ परिणाम मिळतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. पण, आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच, गुंतवणुकीसाठीचे वेगवेगळे पर्याय तुमच्यासमोर असतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
पुढच्या पाच महिन्यांसाठी शनी कुंभ राशीत विराजमान असणार आहेत. वृश्चिक राशीसाठी हा काळ चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांना चांगले गुंतवणूकदार भेटतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकते. तुमच्या मित्राच्या संयोगाने तुम्हाला अनेक चांगली कामे मिळतील. त्यामुळे तुमचा काळ आनंदात जाईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनी कुंभ राशीत विराजमान असल्यामुळे पुढचे पाच महिने चांगला लाभ मिळू शकतो. या दरम्यान तुमच्या प्रेमसंबंधात चांगले सकारात्मक बदल घडून येतील.तसेच, या काळात तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्या. विद्यार्थ्यांना या काळात शुभवार्ता मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तसेच या काळात तुम्ही तुमची रखडलेली कामे देखील पूर्ण करू शकता. तुमच्या कुटुंबात चांगले सकारात्मक वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी सकारात्मक वाटेल. एकूणच तुमचा हा काळ आनंदाचा असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: