Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत शनी (Shani Dev) ग्रहाच्या स्थितीचं विशेष महत्त्व आहे. शनीला (Lord Shani) न्यायाची देवता आणि कर्मफळदाता म्हटलं जातं. शनी ग्रह सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो.
ज्योतिषशास्त्रात, शनीला क्रूर ग्रह देखील म्हटलं जातं. कारण, ज्या राशीच्या लोकांवर शनीची दृष्टी पडते त्यांना जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शनीच्या उलट्या चालीने अनेक राशीच्या लोकांना साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तसेच, शुक्र आणि शनी यांच्यात मैत्रीचं नातं आहे. अशातच शश राजयोगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना चांगला होणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. तसेच, या काळात तुम्हाला चांगल्या नोकरीचे योग जुळून आले आहेत.तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीत शश राजयोग लग्न भवात जुळून आला आहे. अशातच शनीची वक्री चाल तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. अनेक काळापासून तुमच्या ज्या समस्या आहेत त्या हळूहळू दूर होतील. तसेच, तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावणार नाहीत. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. धन-लाभाची चांगली संधी आहे. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असणार आहे. आपापसांतील मतभेद दूर होतील. नात्यात गोडवा येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फरा चांगली ठरणार आहे. या राशीत शश राजयोग जुळून आल्यामुळे तुमच्यासाठी फार लाभदायक ठरणार आहे. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल. या काळात मित्रांच्या साहाय्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. या राशीच्या तरूण वर्गाला लवकरच शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology News : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 4 राशींच्या संपत्तीत होणार प्रचंड वाढ