Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची (Lord Shani) साडेसाती हे नाव ऐकताच आपल्या मनात भीती निर्माण होते. शनी (Shani Dev) एका राशीत किमान अडीच वर्ष राहतात. ज्या राशीत शनी संक्रमण करणार आहे त्या राशीच्या एक राशी आधी आणि एक राशीनंतरच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरु होतो. जसे की, सध्या शनीचं संक्रमण हे कुंभ राशीत सुरु आहे. तर, शनीच्या साडेसातीचा प्रभाव सध्या कुंभसह मकर आणि मीन राशीच्या लोकांवर आहे. 


17 जानेवारी 2023 रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला होता. तेव्हापासून शनी याच राशीत विराजमान आहे. यानंतर शनीचं राशी परिवर्तन 29 मार्च 2025 रोजी होणार आहे. 


केव्हा संपणार शनीची साडेसाती? 


मकर राशीत शनीच्या साडेसातीचे शेवटचे चरण सुरु आहे. 26 जानेवारी 2017 ला मकर राशीवर जी साडेसाती सुरु होती ती 29 मार्च 2025 रोजी संपणार आहे. तर कुंभ राशीवर साडेसातीचा दुसरा चरण सुरु आहे. 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत याच राशीवर शनीची साडेसाती संपणार आहे. तर मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु आहे. या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती 7 एप्रिल 2030 पर्यंत असणार आहे.  


'इतके' दिवस असतो शनीच्या साडेसातीचा प्रभाव 


शनीने जर एका राशीच साडेसाती सुरु केली तर त्याचा प्रभाव 2737 दिवसांपर्यंत तसाच राहतो. यामध्ये 8 विभागात शनीची साडेसातीचा प्रभाव असतो. 


1. 1 ते 100 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला धनहानी होते. तसेच,साडेसातीचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. 


2. 101 ते 500 दिवसांचा कालावधी हा काहीसा समाधानकारक असतो. यामध्ये व्यक्तीला आपल्या व्यवसायात परिवर्तन करण्याची संधी मिळते. तसेच, आरोग्य उत्तम राहते. 


3. 501 ते 912 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येतो. यामध्ये ग्रहकलेश, शत्रूंची भीती, आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. 


4. 913 ते 1600 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला घर सोडावं लागतं. समाजात अपमान सहन करावा लागतो तसेच, मित्र दुरावतात. 


5. 1601 ते 1825 या कालावधीत व्यक्तीला अपमान, कष्ट, रोगराई, आर्थिक तंगी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 


6. 1826 ते 2300 दिवसांपर्यंत व्यक्तीला धनप्राप्ती होते. मात्र, दाम्पत्य जीवनात फार वाद निर्माण होतात. 


7. 2301 ते 2500 दिवसांचा शनीच्या साडेसातीचा हा सर्वात चांगला कालावधी असतो. या काळात प्रगती आणि सौभाग्यात वाढ होते. कार्यात स्थिरता येते. 


8. 2501 ते 2737 या काळात शारीरिक पिडा जसे की, कष्ट, आजार, वाद, धन हानीसह व्यक्तीच्या जीवनात एकाकीपणा येतो. अशा प्रकारे 2737 दिवसांत शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Gauri Visarjan 2024 : ज्येष्ठा गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; आवर्जून टाळा 'या' चुका