Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये कर्मफळदाता शनीचा प्रभाव सर्वात शक्तिशाली मानला जातो. शनी (Shani Dev) ग्रह सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला राशी परिवर्तन करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनीच्या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा दिवस आहे. मात्र, अक्षय्य तृतीयेच्या आधीच म्हणजेच 28 एप्रिल रोजी शनीचं राशी परिवर्तन होणार आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होतो. जसे, शनीचं राशी परिवर्तन होईल तसे चार राशींवर याचा परिणाम होईल. या राशींच्या संकटात वाढ होऊ शकते. कारण उत्तरा भाद्रपद नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीचं नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी संकटाचा असणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फार सतर्कतेचा असणार आहे. या काळात तुमच्यात गैरसमज वाढू शकतो. तसेच, कोणत्याच बाबती पैशांची आर्थिक गुंतवणूक करु नका. कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या समस्यांमध्ये वाढ निर्माण होऊ शकते. तसेच, जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात आपल्या कुटुंबियांची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, या कालावधीत तुम्हाला एकाकीपणा जाणवू शकतो. तसेच, तुम्ही रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमचे कामकाज थोडे रखडू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा मानसिक तणाव सहन करावा लागू शकतो.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सावधानतेचा असणार आहे. या काळात घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. तसेच, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नकारात्मक गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :