Astrology Panchang Yog 25 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 25 एप्रिलचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आज चंद्राचा मीन राशीत संक्रमण होऊन शुक्र, बुध, शनी तसेच राहू ग्रह मिळून पंचग्रही योग (Yog) जुळून आला आहे. आजच्या शुभ राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचं नैटवर्किंग खूप स्ट्रॉंग असणार आहे. आज भावा-बहिणीतील संबंध फार दृढ असतील. त्याचबरोबर तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आज तुमच्या मनातील एखादी गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होईल. आजच्या दिवशी तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे पूर्ण होतील. आज मात्र तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असणं गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला कर्मचाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. धनसंपत्तीचा चांगला लाभ घ्याल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज नोकरदार वर्गातील लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असेल. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. सरकारी योजनांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण करता येईल. जोडीदाराबरोबर चांगला संवाद साधाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल. तसेच, भौतिक सुख-संपत्तीचा तुम्हाला चांगला अनुभव घेता येईल. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :