Shani Dev : न्यायाची देवता म्हटला जाणारा शनिदेव (Shani Dev) जर ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असेल तर त्याचा निश्चितपणे 12 राशींच्या (Horoscope) जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा परिस्थितीत, एका राशीत परत येण्यासाठी साधारण 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनि सध्या त्याच्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. शनि स्वत:च्या राशीत स्थित असल्यामुळे ष नावाचा राजयोग तयार होत आहे. हा एक दुर्मिळ राजयोग आहे जो पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो. हा राजयोग अत्यंत प्रभावी मानला जातो. कुंभ राशीत शश राजयोग तयार झाल्याने या राशींचे भाग्य उजळू शकते. 


ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जेव्हा त्याच्या स्वत:च्या मकर किंवा कुंभ राशीत असतो आणि त्याच्या उच्च राशीतून जात असताना कुंडलीच्या मध्यभागी स्थित असतो तेव्हा हा योग तयार होतो. आत्तापर्यंत या राजयोगाचा फारसा प्रभाव नव्हता. कारण शनि राहूच्या नक्षत्र शतभिषा  नक्षत्रत स्थित होता. पण, आता धनु राशीच्या पूर्व भाद्रपदात शनिने प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाचे परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात चांगल्य वाईट प्रकारे होणार आहेत. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या चढत्या घरात शशा राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशाबरोबरच भरपूर आर्थिक लाभही मिळतील. साल 2025 पर्यंत शनिच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या राशीचे आरोग्य चांगले राहणार आहे. याबरोबरच या कालावधीत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणावापासून आराम मिळेल. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. करिअरमध्ये सुरु असलेले चढ-उतार संपू शकतात. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. तसेच, प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. 


वृश्चिक रास  (Scorpio Horoscope)


शश राजयोगाचा वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनावरही सकारात्मक परिणाम होतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकते. कुटुंबियांबरोबर चांगला वेळ जाईल. या राशीमध्ये शनि चौथ्या भावात स्थित आहे. अशा वेळी या राशीच्या लोकांना स्थावर मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीत शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. गुरु नक्षत्रात असल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शश राजयोग तयार झाल्याने प्रदीर्घ कालावधीपासून सुरु असलेली प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतील. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारापासून आराम मिळू शकतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 2038 पर्यंत 'या' राशींवर असणार शनिची साडेसाती; एकामागोमाग करावा लागणार संकटांचा सामना