Shaniwar upay : हिंदू धर्मग्रंथांमध्ये, आठवड्याचे सर्व सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर केलेले छोटे उपाय देखील शनिदेवाला (Shani Dev) प्रसन्न करू शकतात.
शनिवारी करा शनि स्त्रोत पठण
शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि शनीची पिडा टाळण्यासाठी शनिवारी काही विशेष उपाय केले जातात. जीवनातील दु:खांपासून, त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी विधी आणि पूजा करणे लाभदायक ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी शनीची पूजा करुन आरती करणे आणि शनि स्तोत्राचे पठण करणे अधिक फलदायी असते. यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहेत. प्रत्येक देवदेवतेला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा-विधी केल्या जातात, ग्रहांचंही पूजन केलं जातं. यामध्ये एक असा ग्रह आहे, ज्याच्या नुसत्या नावानेच थरकाप उडतो आणि तो ग्रह म्हणजे शनिदेव! शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी भक्त त्यांना सूर्यास्तानंतर मोहरीचं तेल वाहतात. शनिदेव प्रसन्न झाल्यावर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो, असं मानलं जातं.
शनिदेवाची आरती (Shani Aarti)
जय जय श्री शनिदेव भक्तन हितकारी।
सूर्य पुत्र प्रभु छाया महतारी॥
जय जय श्री शनि देव…
श्याम अंग वक्र-दृष्टि चतुर्भुजा धारी।
नी लाम्बर धार नाथ गज की असवारी॥
जय जय श्री शनि देव…
क्रीट मुकुट शीश राजित दिपत है लिलारी।
मुक्तन की माला गले शोभित बलिहारी॥
जय जय श्री शनि देव…
मोदक मिष्ठान पान चढ़त हैं सुपारी।
लोहा तिल तेल उड़द महिषी अति प्यारी॥
जय जय श्री शनि देव…
देव दनुज ऋषि मुनि सुमिरत नर नारी।
विश्वनाथ धरत ध्यान शरण हैं तुम्हारी॥
जय जय श्री शनि देव भक्तन हितकारी।।
शनि आरतीचे महत्त्व
हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, कोणात्याही देवदेवतांची पूजा केल्यानंतर आरती म्हटली गेली नाही, तर ती पूजा अपूर्ण राहते, त्यामुळे शनिदेवाची पूजा केल्यानंतर आरती आवर्जून म्हणावी. शनिदेवाची आरती मोहरीच्या तेलाने केली जाते, त्यात काळे तीळ घालावेत. घराजवळ शनि मंदिर नसेल, तर पिंपळाच्या झाडाखाली किंवा हनुमान मंदिरात देखील शनिदेवाची पूजा करता येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Jupiter : वृषभ राशीत गुरु होणार अस्त; 'या' राशींना घ्यावी लागणार अधिक काळजी