Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी (Shani Dev) एका ठराविक कालावधीने वक्री आणि मार्गक्रमण करतात. याचा प्रभाव मानवासहित सगळ्यांवर होतो. कर्मफळदाता म्हटल्या जाणाऱ्या शनीने (Lord Shani) 30 जून रोजी वक्री चाल केली आहे. सध्या शनी आपली मूळ रास कुंभमध्ये (Aquarius Horoscope) वक्री अवस्थेत आहेत. यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. त्याचबरोबर या राशींच्या धन-संपत्तीत देखील वाढ होणार आहे. त्यामुळे या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं वक्री होणं फार शुभकारक मानलं जातं. याचं कारण म्हणजे शनी आपल्या मूळ राशीत आहे. तसेच, याच्या संयोगाने शश राजयोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे या कालावधीत तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ दिसून येईल. प्रत्येक कार्यात तुमचा सहभाग असणार आहे. व्यवसायात तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, या काळात तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


शनीची उलटी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल ठरणार आहे. याचं कारण म्हणजे शनी सध्या आपल्या राशीपासून दहाव्या चरणात वक्री झाले आहेत. या दरम्यान तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, भरपूर पैसा कमाविण्या व्यतिरिक्त तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्यातही यशस्वी व्हाल. नोकरदार वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, या काळात व्यापारी लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण शनी तुमच्या राशीत धन-लाभाच्या स्थानी वक्री होणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तुमच्या बुद्धीचा कस लागलेला दिसेल. कौटुंबिक जीवन तुमचे चांगले असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 03 July 2024 : आज प्रदोष व्रताचा दिवस 'या' राशींसाठी लाभाचा; खरेदीचेही योग, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य