Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला (Lord Shani) महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. शनीला (Shani Dev) पापी ग्रह असं देखील म्हटलं जातं. आपल्या अशुभ प्रभावांनी प्रत्येकाला शनी भयभीत करतात. शनीच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण, शनी फक्त अशुभच परिणाम देतात असं नाही तर, शनी शुभ परिणामही देतात. शनीच्या शुभ परिणामांनी व्यक्तीचं जीवन राजासारखं होतं असं म्हणतात. येत्या 30 जूनपासून शनी कुंभ राशीत उलटी चाल चालणार आहेत. शनीची ही उलटी चाल काही राशींसाठी शुभ असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनी दहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. तो लाभाच्या अकराव्या चरणात प्रतिगामी होईल. कुंभ राशीत शनी वक्री झाल्याने मेष राशीच्या लोकांच्या करिअरवर चांगला परिणाम होणा आहे.तसेच, या काळात तुमच्यासमोर उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी आठव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची ही वक्री चाल थोडी आव्हानात्मक ठरू शकते. या दरम्यान तुमच्या कामावरही याचा परिणाम दिसून येईल. पण, त्यानंतर तुम्हाला नक्कीच याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी, शनी सहाव्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. हा सातव्या चरणात प्रतिगमी होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली गती दिसून येईल. तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल. तुमचं एखादं काम रखडलं असेल तर ते लगेच पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी देखील हा काळ चांगला असणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनी पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. तर, सहाव्या घरात तो प्रतिगामी होतो. जे वकिला आहेत त्यांच्यासाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. कामात तुम्हाला जास्त मानसिक ताण जाणवेल. तसेच, हाती घेतलेलं काम पूर्ण न झाल्याने तुमचा संयम तुटेल. पण, थोडी प्रतीक्षा करा. पुढचा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
कुंभ राशीत शनी प्रतिगामी असल्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी चांगला ठरणारा आहे. विशेषत: तुम्हाला काम आणि नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही नोकरी बदली देखील करू शकता. तुम्हाला नक्कीच चांगली ऑफर मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: