Shani Dev : कर्मफळदाता शनी (Lord Shani) हा कुंभ राशीचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) जेव्हा स्वत:च्या राशीत संक्रमण करतात, अस्त होतात, उदय होतात किंवा वक्री होतात तेव्हा राशींवर याचा सर्वाधिक प्रभाव पडतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. पण, शनी जेव्हा वक्री होतो तेव्हा तो अनेक राशींवर परिणाम करतो. कारण शनीचं वक्री होणं हे शुभ मानलं जात नाही. पण, शनी सर्वांसाठी अशुभ असेलच असं नाही. या दरम्यान शनी काही राशींसाठी शुभ देखील ठरणार आहे.
शनी वक्रीची तिथी आणि वेळ
शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. तर, 29 जून रोजी तो याच राशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री करणार आहे. शनी 29 जून रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी वक्री अवस्थेत जाणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम कुंभ राशीवर होणार आहे. तर, शनी कोणत्या राशींसाठी शुभ तर कोणत्या राशींसाठी अशुभ ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
शनीची वक्री चाल म्हणजे काय असते?
ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचं वक्री होणं कुंडली किंवा राशीतील त्या ग्रहाची उलटी चाल दर्शवतो. ज्याला अशुभ मानले जाते. जेव्हा शनी ग्रह एखाद्या राशीत उलटी चाल चालतो तेव्हा फक्त त्याच राशीच्या लोकांसाठी कष्टकारी असते.
त्याचबरोबर शनी वक्री होऊन ज्या राशीत विराजमान आहे त्या राशीच्या लोकांना साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. कारण या अवस्थेत शनीच्या दृष्टीचा प्रभाव पडतो.
'या' राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री अशुभ
शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. तर, मकर, कुंभ आणि मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे. तर, कुंभ राशीत साडेसातीचा दुसरा, मकर राशीत शेवटचा आणि मीन राशीत परहिला चरण सुरु आहगे. या राशीच्या लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीत शनीची ढैय्या सुरु आहे. त्यामुळे या राशींवर शनीच्या वक्रीचा प्रभाव आहे.
'या' राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री शुभ
तर, या दरम्यान सिंह आणि धनु राशीवर शनीच्या वक्रीचा परिणाम होणार नाही. या राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: