Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणून ओळखतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. तसेच, ग्रहांच्या हालचाली वेळोवेळी राशींबरोबरच नक्षत्र परिवर्तन देखील करतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर होतो. 18 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या ठीक एक दिवसाआधी शनी (Shani Dev) पूर्व भाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. याचा परिणाम सर्वच राशींवर होणार आहे. पण, यामध्ये 3 राशींसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


हे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करणारं असू शकतं. या काळात तुम्हाा तुमच्या करिअर आणि नोकरीमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला पैशांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या खर्चात अधिक वाढ होऊन तुमचा बॅंक बॅलेन्स बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करण्याआधी 10 वेळा विचार करा.


कर्क रास (Cancer Horoscope)


शनीची ढैय्या सध्या कर्क राशीवर सुरु आहे तसेच, शनीदेव आपल्या राशीत उलटी चाल देखील चालणार आहेत. त्यामुळे या काळात कर्क राशीच्या लोकांना सांभाळून व्यवहार करण्याची गरज आहे. रक्षाबंधनाचा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात छोट्या-मोठ्या कारणांवरुन वाद होऊ शकतात. जर तुम्हाला दिर्घकालीन सांधेदुखीचा त्रास असेल तर वेळीच डॉक्टरांचे उपचार घ्या. 


कुंभ रास (Aqurius Horoscope)


सध्या शनी कुंभ राशीतच विराजमान आहे. शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने कुंभ राशीच्या लोकांवर देखील परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना पैशांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, तुमचा दिर्घकालीन आजार देखील पुन्हा सुरु होऊ शकतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : अवघ्या 6 दिवसांनंतर बदलणार शनीची चाल, 'या' राशींना नशीब बदलण्याची संधी; नोकरीत प्रगतीसह होणार आर्थिक भरभराट