Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, संक्रमणाचा संबंध सर्व 9 ग्रह आणि 12 राशींबरोबर असतो. याचाच अर्थ जेव्हा एक ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा या प्रक्रियेस संक्रमण म्हणतात. त्यामुळे जेव्हाही एक ग्रह दुसऱ्या राशीत संक्रमण करतात तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर प्रभाव होतो. सर्व ग्रहांमध्ये शनी (Lord Shani) हा सर्वात क्रूर आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो. न्यायदेवता शनी (Shani Dev) 15 नोव्हेंबर रोदी आपली मूळ रास कुंभमध्ये मार्गी होणार आहेत. याचा सकारात्मक परिणाम काही राशींवर (Zodiac Signs) होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीच्या मार्गी चालीमुळे कुंभ राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. देवी लक्ष्मीच्या आणि शनीच्या कृपेने तुम्हाला चांगला धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या मार्गीमुळे वृषभ राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुमच्या व्यवसायाला चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना याचा चांगला लाभ मिळेल. या काळात तुमचं प्रमोशनदेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात तुमचा दृष्टीकोन सकारात्मक असेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना शनीच्या सरळ चालीमुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तरुणांना लग्नासाठी प्रस्ताव येतील. तसेच, तुम्हाला धनाची कधीच कमतरता जाणवणार नाही. पैशांसाठी तुम्हाला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. या काळात तुम्ही मागाल ती इच्छा पूर्ण होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना शनीच्या मार्गीचा चांगलाच लाभ होणार आहे. या काळात तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच, तुम्ही फार उत्साहित असाल. तुमच्या आजूबाजूला सर्व सकारात्मक गोष्टी घडतील. मदतीसाठी तुमचे हात पुढे सरसावतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
शनी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत मार्गी म्हणजेच सरळ चाल चालणार आहेत. याचा या राशीला चांगलाच फायदा होणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, तुमचा बिझनेसचा विस्तार देखील मोठा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :