Shani Margi 2023 : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) क्रूर मानले जाते. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. जे लोक चांगले कर्म करतात त्यांना शनि चांगले फळ देतात, परंतु जे वाईट कर्म करतात त्यांना शनिदेवाच्या नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. शनि सर्वात संथ फिरणारा ग्रह आहे. सुमारे अडीच वर्षे एकाच राशीत राहून ते ढैय्या बनवतात. शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र अखेर आता शनीच्या साडेसातीपासून एका राशीची मुक्तता होणार आहे. जाणून घ्या..
'या' राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती संपणार
शनी सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहे. कुंभ राशीमध्ये शनी उलट दिशेने फिरत असून 4 नोव्हेंबर रोजी तो थेट मार्गी होईल. 4 नोव्हेंबरपासून शनि पुन्हा प्रत्यक्ष फिरण्यास सुरुवात करेल. राशीनुसार कुंभ ही 11वी राशी आहे. या राशीचा शासक ग्रह स्वतः शनिदेव आहे. शनी सध्या कुंभ राशीत आहे. या लोकांवर शनीची साडे सातीची दुसरी अवस्था सुरू आहे. 24 जानेवारी 2022 पासून कुंभ राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू झाली होती. 17 जानेवारी 2023 रोजी शनीने मकर राशी सोडली आणि कुंभ राशीत प्रवेश केला. यानंतर कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण सुरू झाले होते. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती 3 जून 2027 रोजी संपणार आहे
शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या चरणाचा प्रभाव
शनिदेव हे कलियुगाचे दंडाधिकारी म्हणून त्यांचे वर्णन करण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या चरणात व्यक्तीला शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रात शनीची साडेसातीची दुसरी अवस्था सर्वात क्लेशदायक मानली जाते. जेव्हा शनि बाराव्या घरातून पहिल्या घरात प्रवेश करतो, तेव्हा शनीच्या साडेसतीचा दुसरा चरण सुरू होतो. या काळात व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या चरणात व्यक्ती कायदेशीर वादात अडकते. या राशीचा स्वामी शनि असल्याने ते कुंभ राशीच्या लोकांना साडेसतीच्या काळात कमी त्रास देतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा
Shani Dev : शनी मार्गी होण्यापूर्वी 'या' गोष्टी अवश्य करा, शनिदेवाच्या कृपेने सुख-समृद्धी, धनलाभाची शक्यता