Shani Dev : शनिवार हा शनि महाराजांचा दिवस मानला जातो. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी, तसेच त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विविध उपाय केले जातात. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. तर तूळ ही शनीची उच्च राशी आहे. तर, मेष शनिची दुसरी नीच राशी आहे. ज्योतिषशास्त्रात शनि दंडाधिकारी मानला जातो, जो पीडित असतानाच नकारात्मक परिणाम देतो. जर एखाद्या व्यक्तीचा शनि उच्च असेल तर तो त्याला पदावरून राजा बनवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, पत्रिकेत शनि दोष असल्यास या दिवशी केलेल्या उपायांनी आराम मिळतो. या उपायांबद्दल जाणून घेऊया.


 


'या' गोष्टी साडेसातीचा प्रभाव कमी करतात
शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी-देवता वास करतात असे मानले जाते. शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करून, त्यावर जल अर्पण करून आणि तेलाचा दिवा लावून शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात. यामुळे साडेसातीचा प्रभावही कमी होतो असे मानले जाते. शनिवारी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे. असे केल्याने शनिदेवाची कृपा नेहमी राहते आणि राहू-केतूचे दोषही शांत होतात.


 



'या' मंत्रांनी शनि भगवान प्रसन्न होतात
शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, तसेच जन्मपत्रिकेतील साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी शनिदेवाच्या मंत्रांचा जप आणि शिव चालिसाचा पाठ केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात. शनि मंदिरात जाऊन शनि चालीसा, आरती केल्यास त्यांचे आशीर्वादही प्राप्त होतात.


 


शनिवारी 'या' वस्तूंचे दान करा
शनिवारी काळे ब्लँकेट, काळे कपडे दान करणे उत्तम मानले जाते. शनिवारी गरजूंना काळे कपडे किंवा काळे ब्लँकेट दान केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात. शनिदेवाला काळ्या वस्तू खूप प्रिय आहेत. या दिवशी लोखंडाचे दान करूनही शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे. या दिवशी गरजूंना धान्य दान केल्याने शनिदोष, साडेसाती, शनीची ढैय्या यांचा प्रभाव कमी होतो आणि शनिदेवही प्रसन्न होतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Shani Dev : मकर, कुंभ, मीन राशीवर साडेसाती, तर कर्क-वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव किती वर्षे राहील? जाणून घ्या