Ex Husband Ritesh On Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' तसेच 'बिग बॉस'ची बायको म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीने (Adil Khan Durrani) राखीची फसवणूक केल्याने ती प्रचंड दुखावली गेली आहे. तिने आदिलवर मारहाण, फसवणूक तसेच विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेशने अभिनेत्रीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 


राखीसोबत आदिल कसा वागला हे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे. दरम्यान राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेशने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला,"राखीने आयुष्यभर साथ देईल असा कोणीतरी शोधायला हवा". 


रितेशने दिला राखीला न्याय


राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेशनेदेखील राखीची फसवणूक केली होती. राखीचे आधी रितेशचं लग्न झालं होतं. पण पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तो ड्रामा क्वीनसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण गेल्या वर्षी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राखीने रितेशवर अनेक आरोप केले होते. नुकतचं एका मुलाखतीत रितेश म्हणाला,"राखीसोबत पुन्हा एकदा असं कसं होऊ शकतं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. माझ्यासोबत असं दोनदा घडलं आहे. त्यामुळे मी किंवा राखी चुकीची आहे असा याचा अर्थ होत नाही".


रितेशने का सोडली राखीची साथ? 


रितेश एका मुलाखतीत म्हणाला होता,"आई-वडिलांनंतर राखीने मला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे. तिने माझी खूप काळजी घेतली आहे. पण आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडतात. कधी-कधी ब्रेक घेण्याची खूप गरज असते. मला थोडा ब्रेक हवा होता. त्यामुळे मी राखीपासून विभक्त झालो आणि आई-वडिलांकडे राहायला गेलो". 






रितेशला वाटते राखीची काळजी 


रितेश पुढे म्हणाला,"आज मी राखीसोबत नसलो तरी तिला कधीच चुकीचा सल्ला देणार नाही. आदिल राखीचा छळ करायचा हे तिने मला सांगितलं होतं. आता मला खरचं राखीची खूप काळजी वाटत आहे". रितेशला राखीची काळजी वाटत असली तरी त्याला पुन्हा राखीच्या आयुष्यात येण्याची इच्छा नाही. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant : राखी सावंतला अश्रू अनावर; पॅपराझींसमोर म्हणाली, "मला आई व्हायचं होतं, पण..."