Shani Dev Monthly Horoscope : ऑगस्ट महिना अवघ्या एका दिवसावर आहे. या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे हा महिना अनेक अर्थांनी खास असणार आहे. सण उत्सवाबरोबरच या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. तसेच, कर्मफळदाता शनी ऑगस्ट महिन्यात काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांसाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे. शनीच्या (Shani Dev) शुभयोगाने काही राशींचे प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत.
तर, ऑगस्ट महिन्यात कोणत्या कोणत्या राशींसाठी शनी लकी ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा संपूर्ण महिना नवीन नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने फार चांगला असणार आहे. शनीचा सप्तम चरणापासून नववा पंचम राजयोग जुळून येणार आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने जरी हा महिना तुम्हाला संतुष्ट करणारा नसला तरी शेअर मार्केटमध्ये तुमचे शेअर्स अधिक वाढताना दिसतील ज्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
नोकरदार वर्गातील लोकांना या महिन्यात कामाचा ताण वाढताना दिसेल. वर्कलोडमुळे तुमच्या लाईफस्टाईलवर परिणाम होईल. तसेच, कुटुंबीयांना फारसा वेळ देता येणार नाही. 15 ऑगस्टनंतर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
करिअरच्या दृष्टीने ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फार खास असणार आहे. दशम चरणात शनीचा शश योग जुळून येणार असल्याने तुमच्या नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. राजकारणात तुमची रुची वाढलेली दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामात चांगली प्रगती दिसून येईल. सहकाऱ्यांचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. पण, आळस करु नका. अन्यथा तुमची सगळी कामं बिघडतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना काही अर्थाने शुभ असणार आहे. शनी सहाव्या चरणात स्वगृही होऊन संक्रमण करणार आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासात चांगलाच वाढलेला दिसेल. 16 ऑगस्टपासून सूर्य सातव्या चरणात असल्यामुळे तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या कामातही चांगली प्रगती दिसून आल्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :