Shaniwar Upay : शनि पूजेसाठी शनिवारचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी शनिदेवाला (Shani Dev) आवडणारं काम करून शनिदेवाला प्रसन्न करता येतं. कुंडलीत शनि कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत शनिदेवाशी संबंधित काही उपाय (Shaniwar Upay) केल्यास शुभफल प्राप्त होते.
शनिवारी काही विशेष उपाय केल्याने जीवन सुकर होतं आणि सर्व समस्या दूर होतात. ज्या लोकांच्या आयुष्यात अडचणी येत आहेत, त्यांच्या अडचणी दूर होतात आणि चांगल्या गोष्टी घडू लागतात. शनिदेवाचे कोणते उपाय आहेत, जे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात? जाणून घेऊया.
शनिवारी करा हे आठ उपाय
1. ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती चालू आहे, त्यांनी शनिवारी बीज मंत्राचा (ऊँ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नमः) 108 वेळा जप करावा. असं केल्याने शनिदेवाची तुमच्यावर कृपा राहील आणि तुम्हाला शनिदोष आणि साडेसातीच्या फेऱ्यापासून मुक्ती मिळेल. तुम्ही मंदिरात जाऊन किंवा घरी बसून शनीच्या या मंत्राचा जप करू शकता.
2. शनिदेवाची पूजा करण्यासोबतच शनिवारी कावळ्यांना आणि काळ्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घातल्याने तुमचं नशीब उजळू शकतं. काळ्या कुत्र्याला शनिदेवाचं वाहन मानलं जातं. जर तुम्हाला शनिवारी काळा कुत्रा दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ असू शकतं, याशिवाय कावळ्यांना भाकरी खाऊ घातल्यानं देखील शनिदेव प्रसन्न होतात.
3. शनिवारी दानाला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरीब लोकांना काळे उडीद, काळी छत्री, घोंगडी, काळे तीळ, चप्पल इत्यादी दान करा. या वस्तूंचं दान केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दान करू शकता.
4. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर अर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शनिवारच्या दिवशी एक रुपायचं नाणं घ्या आणि त्या नाण्यावर मोहरीच्या तेलाचा एक ठिपका लावून शनि मंदिरात ठेवा. यानंतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी शनिदेवाकडे प्रार्थना करा.
5. जर तुम्हाला प्रत्येक कामासाठी अतोनात झटावं लागत असेल, खूप मेहनत केल्यावरच यश मिळत असेल, लवकर एखादं काम पूर्ण होत नसेल तर हा उपाय करा. शनिवारच्या दिवशी मूठभर काळे तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात सोडा. तसेच शनिदेवाचे ध्यान करत प्रार्थना करा.
6. वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा उपाय करा. शनिवारच्या दिवशी एक पिठाचा दिवा बनवा, त्यात मोहरीचे तेल टाका, दिव्याला वात करा आणि शनिदेवासमोर दिवा लावा. तुमच्या मनातील इच्छा शनिसमोर व्यक्त करा.
7. जर तुम्हाला एखाद्या सरकारी कामात अडचणी येत असेल तर या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनि स्तोत्राचं पठण करा. दिवसभरात कधीही तुम्ही शनि स्तोत्राचं पठण करू शकता, परंतु हा पाठ करताना तुमचं तोंड पश्चिमेकडे असावं, कारण पश्चिम ही शनीची दिशा आहे.
8. समाजात प्रसिद्धी आणि मान-सन्मान प्राप्त करण्यासाठी शनीचा हा उपाय करा. शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि शनिदेवाच्या मंत्राचा 51 वेळा जप करावा.
शनिदेव मंत्र : ओम प्रं प्रेमं स: शनैश्चराय नमः।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :