Shani Dev : वैदिक धर्मशास्त्रानुसार, श्रावण (Shravan) महिन्यात एकमागोमाग सणांची रांगच लागली आहे. नुकतीच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन झाली आता सर्वांना वैध लागलेत ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे. जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा आठवा अवतार मानतात.

पंचांगानुसार, 15 ऑगस्ट 2025 रोजी श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशभरात साजरा केला जाणार आहे. मात्र, जन्माष्टमीच्या आधीच या 3 राशींच्या नशिबाचे दार उघडू शकतात. कारण शनि महाराज या राशींना मोठा संकेत देणार आहेत. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

त्रिएकादश योग

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसारशनी सध्या मनी राशीत वक्री म्हणजेच उलटी चाल चालत आहेत. तर, नोव्हेंबरपर्यंत शनी याच राशीत स्थित असणार आहे. या दरम्यान शनी आणि अरुण ग्रह एकमेकांच्या 60 डिग्री अंशावर येणरा आहेत. यामुळे त्रिएकादश योग निर्माण होणार आहे. हा दुर्लभ योग जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर जुळून येणार आहे.

अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि शनिदेवाचा अंकसुद्धा 8 आहे. त्यामुळे यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शनीचा हा शुभ योग अनेक राशींसाठी फार महत्त्वाचा आणि शुभ मानला जाणार आहे.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगला लाभ मिळेल. तसेच, या राशीच्या पाचव्या चरणात शनि देव विराजमान आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरच एखादी शुभवार्ता मिळेल. नोकरी-व्यवसायात तुमचे चांगले संबंध निर्माण होतील.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

या राशीच्या दुसऱया चरणात शनी देव वक्री अवस्थेत विराजमान आहेत. त्यामुळे या दरम्यान तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमची धार्मिक कार्यात चांगली रुची वाढलेली दिसेल. धनधान्याची प्राप्ती होईल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला जाणार आहे. कारण या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, तुम्हाला करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल. मित्रांचा चांगला सपोर्ट मिळेल. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Horoscope Today 14 August 2025 : आज दत्तगुरुंची 'या' 5 राशींवर असणार कृपा, हाती घेतलेलं कार्य निर्विघ्न पार पडेल; आजचे राशीभविष्य