Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये शनीला कर्मफळदाता म्हटलं जातं. शनी (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे हा सर्वात पापी आणि सर्वात शुभकारक ग्रह मानला जातो. याचा अर्थ, शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे जर एखाद्या राशीवर शनीचा शुभ प्रभाव असला तर तो दीर्घकाळ सुरु राहतो. तर, जर एखाद्या राशीवर शनीची साडेसाती सुरु असेल तर हा नकारात्मक परिणाम देखील दीर्घकाळापर्यंत राहतो. त्यामुळेच शनीच्या हालचालीकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. 


आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनीचा 8 हा प्रिय अंक आहे. 8 अंकाचा (Mulank) शासक ग्रह शनी आहे. तसेच, आजची तारीख 8 आहे. ऑगस्टचा महिना देखील 8 वा आहे. तसेच, चालू वर्ष 2024 याची एकूण बेरीज करता येणारी संख्या देखील 8 आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थाने खास असणार आहे. 


ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ अंकाचा परिणाम तीन राशींवर होणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या 3 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे आजच्या दिवसाचा शुभ परिणाम मकर राशीच्या लोकांवर होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळाली असल्या कारणाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. त्यामुळे आजचा तुमचा दिवस अतिशय आनंदता आणि उत्साहात जाणार आहे. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


मकर राशीप्रमाणेच कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. त्यामुळे शनीच्या या शुभ दिवसाचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांवर देखील होणार आहे. या काळात तुम्ही नियोजित केलेली सर्व कामे पार पाडू शकता. नोकरदार वर्गातील लोकांना कामात चांगला प्रतिसाद मिळेल. सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही एका नवीन प्रोडेक्टवर काम करु शकता. तसेच, आजच्या दिवशी तुम्ही तुमची इच्छा जर बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीत शनीला सर्वात उच्च स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा शुभ परिणाम तूळ राशीच्या लोकांवर देखील पडणार आहे. विद्यार्थ्यांना देखील अभ्यासात चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून सुरु असलेली साडेसातीही या काळात दूर होण्याची शक्यता आहे. शनीतचा शुभ प्रभाव असल्यामुळे तुमचं आरोग्या देखील ठणठणीत असणार आहे. फक्त बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Vinayak Chaturthi 2024 : 'हा' आहे विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त, 'अशी' करा बाप्पाची मनोभावे पूजा; जाणून घ्या योग्य वेळ