Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीला (Shani Dev) कधीच हलक्यात घेऊ नये. कारण शनी जेव्हा क्रूर होतात तेव्हा अनेक राशींनी सावध होण्याची गरज असते. ज्या राशींना शनी दंड देतो त्या राशींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. शनी सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळे एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी शनीला अडीच वर्षांचा कालावधी लागतो.
वैदिक पंचांगानुसार, 7 मे 2025 रोजी म्हणजेच आज शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या या राशी संक्रमणाने काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. कारण शनी मीन राशीत असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
या राशीच्या दहाव्या स्थानी शनी विराजमान होणार आहे. त्यामुळे तुमच्या कर्म, प्रतिष्ठेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणावाचा सामना करावा लागेल.
उपाय - यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी काळी उडद डाळ आणि तीळ दान करावे. तसेच, हनुमान चालीसाचा पाठ करावा.
सिंह रास (Leo Horoscope)
या राशीच्या वैवाहिक जीवन आणि सामाजिक बांधीलकीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात कोणाचाही अपमान करु नका. तसेच, बोलताना आधी विचार करा. तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात.
उपाय - यासाठी तुम्ही शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा. तसेच, “ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा.
तूळ रास (Libra Horoscope)
शनीदेवाला तूळ रास प्रिय आहे. मात्र, या राशीने देखील निष्काळजीपणा केल्यास नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. पैशांच्या बाबतीत तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या बाबती देखील तुम्हाला तक्रारी जाणवतील. या काळात वाहन चालवताना काळजी घ्या.
उपाय - शनीदेवाच्या मंदिरात मोहरीचं तेल चढवा. तसेच, काळ्या कुत्र्याला चपाती द्या. भगवान हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीचा स्वामी शनी आहे. या राशीसाठी देखील शनीच्या राशी संक्रमणाचा काळ आव्हानात्मक ठरु शकतो. या राशीला मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, कोणताही निर्णय घेताना आधी विचार करा. कुटुंबियांचं मत विचारात घ्या. अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो.
उपाय - शनी स्त्रोताचं नियमित पठण करा. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)