Shani Margi 2025 : 2025 वर्षात शनीचंच राज्य असणार आहे, त्यामुळे जे शनिदेवाला हलक्यात घेतात, त्यांनी सावध राहावं. नवीन वर्षात शनि कोणालाही माफ करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतं. शनीचा प्रकोप टाळण्यासाठी आतापासूनच उपाय करायला हवेत आणि ज्या कामांमुळे शनीचा सर्वाधिक कोप होतो, ती कामं त्वरित थांबवली पाहिजे.
शनि राशी परिवर्तन 2025 कधी? (Shani Gochar 2025)
शनिदेव प्रदीर्घ काळानंतर 2025 मध्ये राशी बदलणार आहेत. वैदिक पंचांगानुसार, 29 मार्च 2025 रोजी शनि कुंभ राशीतून निघून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. शनिदेव 2027 पर्यंत त्याच राशीत राहील. म्हणजे तब्बल अडीच वर्षं शनि मीन राशीत राहील. 2025 मध्ये शनि तीन वेळा नक्षत्र बदलेल. ज्योतिषशास्त्रात शनि हा क्रूर आणि कठोर ग्रह म्हणून ओळखला जातो, यामुळेच शनीला सर्वजण घाबरतात.
2025 मध्ये कोणत्या राशीच्या लोकांना शनिपासून धोका?
मेष रास - मार्च 2025 पर्यंत तुमच्यावर शनीची शुभ दृष्टी असेल. मार्चपर्यंत शनीच्या शुभ दृष्टीमुळे तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. परंतु, त्यानंतर तुमचा वाईट काळ सुरू होईल. मार्चला शनीच्या राशी परिवर्तनानंतर तुमचं आचरण चांगलं ठेवावं. कोणतंही अनिष्ट काम करणं टाळा. स्वतःच्या फायद्यासाठी कोणतंही अन्यायकारक पाऊल किंवा कृती केली तर शनि शिक्षा करण्यास उशीर करणार नाही. शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनि मंदिरात शनिदेवाला तेल अर्पण करावं आणि उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना अन्न-पाण्याची व्यवस्था करावी.
सिंह रास - जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत शनिमुळे तुम्ही विशेष काही करू शकणार नाही. शनि तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकण्यास सांगेल आणि जर तुम्ही चुका पुन्हा न करण्याची शपथ घेतली तर एप्रिल 2025 पासून शनि शुभ फल देण्यास सुरुवात करेल. शनिदेव तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्त्रियांचा अनादर करू नका, असं सूचित करत आहे. त्यामुळे नवीन वर्षात महिलांचा आदर करा. कोणावरही टीका करू नका, कुणाच्या यशाचा मत्सर करू नका. शनीला प्रसन्न ठेवण्यासाठी शनिवारी कुष्ठरुग्णांची सेवा कर, गरिबांना दान करा.
कुंभ रास - नवीन वर्षात म्हणजेच मार्च 2025 नंतर शनीची तुमच्यावर नजर असेल. काही प्रकरणांमध्ये याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. या वर्षी शनि महाराज तुमच्या मोठ्या अडचणी दूर करत असल्याचं दिसत आहे. व्यापार आणि नोकरीसाठी शुभ संकेत आहेत. धार्मिक प्रवासासाठीही शनि कारक ठरू शकतो. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी बदलू इच्छितात त्यांना मे नंतर चांगल्या संधी मिळू शकतात. शनीची कृपा मिळवण्यासाठी गरीब मुलीच्या लग्नात गुप्त दान करा. परिश्रम करणाऱ्यांना वस्त्रं इत्यादी दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: