Shani Gochar 2025 : शनीच्या वाईट प्रकोपाला सर्वच जण घाबरतात. ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani 2025) खूप महत्त्वाचं स्थान आहे. शनिदेवाचा आशीर्वाद आपल्यावर असावा,अशी प्रत्येकाची इच्छा असते. यातच तब्बल अडीच वर्षांनंतर शनि रास बदलणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनानंतर अनेक राशींना चांगले दिवस येतील, तर काही राशींना साडेसातीचा सामना करावा लागेल. 29 मार्च 2025 रोजी शनि मीन राशीत प्रवेश करेल, सध्या तो स्वत:च्या कुंभ राशीत आहे. शनीच्या राशी परिवर्तनाने 3 राशींच्या नशिबाला चार चाँद लागतील आणि त्यांच्या धनसंपत्तीत अपार वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


कर्क रास (Cancer)


शनि मीन राशीत प्रवेश करेल आणि कर्क राशीच्या नवव्या घरात राहील. अशा स्थितीत या राशींच्या लोकांचं आयुष्य पुन्हा रुळावर येऊ शकतं. कामातील अडथळे दूर होऊ शकतात. यासोबतच तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. व्यावसायिक प्रवासातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासोबतच अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्ही चांगली कमाई करू शकता. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद आता संपू शकतात.


कन्या रास (Virgo)


या राशीमध्ये शनी सातव्या भावात असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ खूप चांगली असेल. प्रेमविवाहाचीही शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळू शकतो. आवश्यक कामासाठी बँकेकडून सहज कर्ज मिळू शकतं. यासोबतच भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफाही मिळू शकतो. या राशीच्या लोकांना लांबचा प्रवास करावा लागू शकतो. अर्थात, यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, परंतु मानसिक तणावातून तुम्हाला आराम मिळेल. घरातील वातावरण चांगलं राहील. तुम्ही परदेशात व्यवसाय करण्याचीही शक्यता आहे.


तूळ रास (Libra)


या राशीच्या सहाव्या घरात शनिचं भ्रमण होईल. अशा स्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. यासोबतच तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाने सर्वांचं मन जिंकू शकता. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीच्या भरपूर संधीही मिळू शकतात. पण जुलै ते नोव्हेंबर या काळात आरोग्याबाबत थोडं सावध राहण्याची गरज आहे. येत्या काळात तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक समस्येपासून आराम मिळू शकतो. शत्रूंवर वर्चस्व गाजवू शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक चांगलं यश मिळवू शकतात. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Rahu 2025 : शक्तिशाली राहू पालटणार 3 राशींचं नशीब; मार्चपर्यंत चांदीच चांदी, पदोपदी होणार आकस्मिक धनलाभ