Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्यायदेवता आणि कर्मफळदाता म्हणतात. शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. असं म्हणतात की, शनीची ज्या राशींच्या लोकांवर कृपा असते त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत स्थित असतात. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीचं संक्रमण होण्याआधी 28 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज शनी कुंभ राशीत अस्त होतोय. या दरम्यान जवळपास 40 दिवस अस्त झाल्यानंतर 9 एप्रिल रोजी शनीचा उदय होणार आहे. शनीच्या अस्ता दरम्यान काही राशींवर याचा अत्यंत शुभ परिणाम होणार आहे. काही राशींसाठी हा काळ फार भाग्यशाली ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी मेष राशीच्या अकराव्या चरणात अस्त होणार आहे. शनीच्या प्रभावाने मेष राशीच्या लोकांना नोकरीच्या उत्तम संधी मिळतील. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील मिळेल. तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती होईल. अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या आठव्या चरणात शनीचा अस्त होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरीचे अनेक प्रस्ताव येतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. नातेवाईकांच्या घरी आगमनामुळे तुम्ही खुश व्हाल. तसेच, या काळात लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ असेल.

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या तिसऱ्या चरणात शनीचा अस्त होणार आहे. शनीच्या अस्तामुळे धनु राशीच्या लोकांना चांगलाच आर्थिक लाभ मिळणार आहे. या काळात करिअरमध्ये चांगले प्रगतीचे वारे वाहू लागतील. चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या वेतनात देखील वाढ झालेली पाहायला मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात तुम्हाला यश येईल. भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:       

Astrology : आज मालव्य राजयोगासह गजकेसरी योगाचा जुळून आला 'महासंयोग'; मिथुनसह 'या' 5 राशींना महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळणार लाभ