Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) हा सर्व नवग्रहांमध्ये सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच, एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, 28 जानेवारी रोजी शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. तसेच, त्या अवस्थेत मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीचे कुंभ आणि मीन राशीत अस्त होण्याने काही राशींच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 07 वाजून 01 मिनिटांनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. यामुळे 37 दिवसांपर्यंत अस्त अवस्थेत राहून 6 एप्रिल 2025 रोजी उदित होणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीत शनीच्या अस्त होणं अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या आठव्या चरणात शनी अस्त होणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या तिसऱ्या चरणात शनी अस्त होणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. त्याचबरोबर तुमच्या कामातून तुम्हाला चांगलं समाधान मिळेल. तसेच, भावा-बहिणी बरोबर तुमचं नातं अधिक दृढ होताना दिसेल. वैवाहिक नातेसंबंधात गोडवा टिकून राहील. तसेच, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं अस्त होणं सामान्य ठरणार आहे. या काळात तुमच्या नोकरीत तुम्हाला चांगले बदल पाहायला मिळतील. तसेच, अनेक काळापासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, या काळात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: