Shani Amavasya 2025 : वैदिक शास्त्रानुसार, येत्या 23 ऑगस्ट 2025 रोजी शनी अमावस्या असणार आहे. या दिवसाला श्रावण अमावस्याही म्हणतात. मात्र, ही अमावस्या शनिवारी असल्या कारणाने याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. शनी अमावस्येला (Shani Amavasya) सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या आई आणि गुरु म्हणजे शुक्रला प्रसन्न करणं गरजेचं आहे. याच संदर्भात अधिक माहिती डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिली आहे. 

शनि आणि शुक्र यांचे नाते :

शनि देव सूर्यपुत्र आहेत.त्यांच्या जीवनात गुरु म्हणून शुक्राचार्य यांची विशेष भूमिका आहे.महाभारत, पुराणे व नाडी ग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की शनि यांनी शुक्राचार्यांना आपले गुरु आणि मातृतुल्य मानले.

कारण :

शनि लहानपणी सूर्याच्या तेजामुळे दुर्लक्षित झाले, त्यांना माता छाया (संवर्णा) हिचा संग कमी मिळाला.त्या काळात शुक्राचार्यांनी शनीला आश्रय व शिक्षण दिले.म्हणून शनि शुक्रांना केवळ गुरुच नाही तर आईसमान आदर देतात.

ज्योतिषशास्त्रात

शनि आणि शुक्र हे सर्वात जास्त मैत्रीपूर्ण ग्रह मानले जातात. म्हणूनच कुंडलीत शनि-शुक्र योग (उदा. शश-शुक्र राजयोग) आले तर धन, ऐश्वर्य, राजसत्ता आणि कलात्मक यश मिळते.

थोडक्यात शनि शुक्राला आपली आई मानतात हे पुराणांतील प्रतिकात्मक वर्णन आहे, कारण शुक्राने शनीला मातेसारखा आधार दिला.

शनि अमावस्या (23 ऑगस्ट 2025 शनिवारी येणारी अमावस्या) ही दिवस शनि उपासनेसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.जर या दिवशी शुक्राचा विशेष उपाय केला, तर शनि–शुक्र दोन्ही ग्रहांची कृपा मिळते आणि ऐश्वर्य, सुख-संपत्ती, विवाहसुख, ऐशोआराम यामध्ये प्रगती होते.

शनि अमावस्येला करावयाचा शुक्र विशेष उपाय :

1. शुक्रासाठी दान :

शुभ्र वस्त्र (पांढरे कपडे)पांढरे फुल, दही, तूप, साखर, तांदूळहे वस्तू गरीब स्त्रिया, कन्या, ब्राह्मण किंवा मंदिरात दान करावे.

2. मंत्र जप :

शुक्राचा बीज मंत्र:

ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः 

शनि अमावस्येला कमीत कमी 16 माळा जपल्यास फल अधिक वाढते.

3. ध्यान व उपासना :

संध्याकाळी पांढऱ्या कपड्यात बसून पूर्वेकडे तोंड करून शुक्र मंत्र जपावा.गुलाब किंवा चमेलीच्या अगरबत्त्या लावून शुक्राला प्रसन्न करावे.

4. शनि-शुक्र संतुलन :

शनिदेवाला काळ्या तीळ-तेलाचा दीप द्या.त्यानंतर शुक्रासाठी दुध, साखर आणि तुपाचा दीप लावा.

हा उपाय केल्यास शनि–शुक्र दोन्ही ग्रह एकत्र प्रसन्न होतात.

परिणाम :

आर्थिक अडथळे दूर होतातवैवाहिक जीवनात मधुरता येतेआलिशान सुख, गाडी, घर, ऐशोआराम, कला-प्रतिभेत यश मिळते

डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :

September Grah Gochar 2025 : शुक्र, बुध, गुरुसह या राशींचं होणार परिवर्तन; सप्टेंबर महिन्यात 'या' 3 राशींचं नशीब बदलणार, पैशांचा पडणार पाऊस