September Month 2025 Grah Gochar : वैदिक पंचांगानुसार, सप्टेंबर (September) महिना आजपासून सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. याचा प्रभाव मानवासह जगभरात पाहायला मिळणार आहे. माहितीसाठी सप्टेंबर महिन्यात सूर्य ग्रहाबरोबरच मंगळ, बुध आणि शुक्र ग्रहसुद्धा राशी परिवर्तन करणार आहेत. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाचं संक्रमण 13 सप्टेंबर रोजी तूळ राशीत होणार आहे. तर, 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत संक्रमण करणार आहे. त्याचबरोबर 15 सप्टेंबर रोजी सिंह राशीत संक्रमण करणार आहे. बुध ग्रहाचं सुद्धा कन्या राशीत संक्रमण होणार आहे. त्यामुळे हा काळ काही राशींसाठी फार भाग्यशाली असणार आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धुन राशीसाठी 4 ग्रहांच्या चालीत होणारा बदल फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी चांगला लाभ मिळेल. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुमचा चांगला दबदबा निर्माण होईल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. तसेच, या काळात करिअरशी संबंधित तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळेल. तुम्ही पैशांची गुंतवणूक करु शकता.
वृषभ रास (Taurus Horoscope)
हा काळ तुमच्यासाठी फार लाभदायक ठरणार आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर नवीन कार्याची सुरुवात करु शकता. मित्रांचं विशेष सहकार्य तुम्हाला लाभेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या ध्येयाप्रती तुम्ही फार प्रामाणिक असाल. तुमच्या कामाचं समाजातून फार कौतुक झालेलं दिसेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल ठरणार आहे. तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नशिबाची चांगली साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच, तुमची रखडलेली कार्य तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. नोकरदार वर्गातील लोकांना मानसिक शांतता मिळेल. कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. या काळात आरोग्याच्या बाबतीत कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. फक्त नियमित व्यायाम करणं तसेच, संतुलित आहार घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :