Weekly Lucky Zodiac Signs 1 to 7 September 2025 : आजपासून सप्टेंबर महिन्याचा नवा आठवडा सुरू झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अनेक शुभ ग्रहांचा योग जुळून येणार आहे. त्यामुळे सप्टेंबरचा हा आठवडा ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीच्या दृष्टीकोनातून अत्यंत खास आहे. या आठवड्यात 5 राशींना या राजयोगाचा सर्वाधिक फायदा होईल. या आठवड्यात या लोकांना पैशांच्या लाभासोबतच करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळणार आहेत. या आठवड्यात कोणत्या 5 राशी भाग्यवान असतील ते जाणून घेऊया. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी आठवड्याची सुरुवात उत्साहाची असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तसेच, समस्येचं उत्तर मिळेल. तसेच, तुम्ही जी कामं करण्याचं नियोजन केलं आहे. ते तुम्हाला पूर्ण करण्यात यश मिळेल. या आठवड्यात एखाद्या महिलेच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील. तसेच, नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तसेच, आरोग्य देखील उत्तम राहील. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात अनेक शुभवार्ता मिळतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला प्रोजेक्टवर काम करता येईल. कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. मुलांच्या शिक्षणात तुम्हाला चांगले बदल घडून येताना दिसतील. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येऊ शकतील. तसेच, सामाजिक कार्यात तुमचा सहभाग जास्त वाढलेला दिसेल. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होईल. धार्मिक कार्यात मग्न व्हाल. 

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या कालावधीत तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, पार्टनरबरोबर तुमचं छान बॉन्डिंग पाहायला मिळेल. नवीन लोकांशी ओळख निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. समाजातील प्रतिष्ठीत लोकांबरोबर तुमच्या भेटी गाठी होतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.