September 2025 Monthly Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिना (September) लवकरच सुरु होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती तशी शुभ मानली जातेय. त्यामुळे या पवित्र महिन्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांची स्थिती बदलणार आहे. त्यामुळे सप्टेंबरचा महिना तूळ ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार आहे यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.

तूळ मासिक राशीभविष्य (Libra Monthly Horoscope September 2025)

तूळ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा महिना सुखकारक असणार आहे. या महिन्यात काही जबाबदाऱ्यांचं ओझं तुमच्यावर असणार आहे.पण त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. कुटुंबियांबरोबर चांगलं खेळीमेळीचं वातावरण राहील. तसेच, या महिन्यात तुम्ही नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता. ग्रहांची स्थिती शुभ असल्याने त्याचा तुमच्यावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं कर्म करत राहा. 

वृश्चिक मासिक राशीभविष्य (Scorpio Monthly Horoscope September 2025)

वृश्चिक राशीसाठी सप्टेंबरचा महिना संधी घेऊन येणारा असणार आहे. या महिन्यात तुम्ही टीम वर्कने काम करण्यासाठी तसेच, नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी प्रामाणिकपणे तुमचं काम करा. फळाची चिंता करु नका. तसेच, कोणाच्या अध्यात मध्यात पडू नका. फिरायला जाण्याचे अनेक योग जुळून येतील. त्याचा चांगला लाभ घ्या. 

धनु मासिक राशीभविष्य (Saggitarius Monthly Horoscope September 2025)

धनु राशीसाठी सप्टेंबरचा महिना काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सावधानता बाळगा. तसेच, कोणतीही मोठी जोखीम हाती घेऊ नका. तुमच्यावर संकट ओढावण्याची शक्यता आहे. तसेच, पैशांची गुंतवणूक किंवा नवीन प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल 

मकर मासिक राशीभविष्य (Capricorn Monthly Horoscope September 2025)

मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना सामान्य असणार आहे. तसेच, या महिन्यात तुम्ही एका नवीन विचाराची सुरुवात करु शकता. तसेच, या काळात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येऊ शकतात. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल. 

कुंभ मासिक राशीभविष्य (Aquarius Monthly Horoscope September 2025)

कुंभ राशीसाठी सप्टेंबरचा महिना लाभदायक असणार आहे. तसेच, ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. तसेच, या महिन्यात तुम्हाला पैसा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 

मीन मासिक राशीभविष्य (Pisces Monthly Horoscope September 2025)

मीन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा महिना लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमचे नातेसंबंध घट्ट होतील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैशांचा जपून वापर करावा लागेल. मित्रांचा चांगला सपोर्ट मिळेल. 

हेही वाचा :          

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Margi 2025 : तब्बल 500 वर्षांनंतर शनी-गुरु आमने-सामने; 'या' 3 राशींना लागणार लॉटरी, पैशांचा पडणार धो-धो पाऊस