Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. तर, गुरु ग्रह अध्यात्म, समृद्धी आणि धन संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. नोव्हेंबर महिन्यात शनी देव मार्गी चाल चालणार आहेत. तर, याच महिन्यात गुरु ग्रह वक्री चाल चालणार आहेत. गुरु ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

तूळ रास (Libra Horoscope)

गुरु ग्रह बृहस्पती वक्री आणि शनि देव सरळ चाल चालणार असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. या राशीच्या कर्म स्थानी हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे नोकरीत तुमची चांगली प्रगती होईल. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गोष्टी करता येतील. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळे. सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शनी देवाची मार्गी चाल आणि गुरु ग्रहाची वक्री चाल या राशीसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या राशीच्या धन भावात तर गुरु ग्रह सहाव्या स्थानी वक्री होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार ानही. तसेच, कुटुंबात देखील आनंदी वातावरण पाहायला मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

गुरु ग्रह बृहस्पतीची वक्री चाल आणि शनी देवाची सरळ चाल या राशीसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या धन स्थानी वक्री तर शनी देव कर्म स्थानी सरळ चाल चालणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरी-व्यवसायात तुमची चांगली प्रगती झालेली दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल. 

हेही वाचा :          

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

September 2025 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा महिना चांगला की वाईट? कसा जाणार महिना? मासिक राशीभविष्य वाचा