Scorpio Horoscope Today 24 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे एखादे काम अडकले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करतील. घरोघरी शुभ कार्यक्रमही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते आज सहज मिळेल. नवीन कामे पूर्ण करण्यासाठी महिला (Women) सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गेले काही दिवस जे खूप व्यस्त होते, त्यांना आज स्वतःसाठी मोकळा वेळ मिळू शकेल. 


वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांना आज कामाच्या ठिकाणी दबावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल, अनावश्यक खर्च आणि अचानक होणाऱ्या खर्चामुळे बजेट बिघडेल. आज कामात मन चंचल राहील. मात्र, कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सतर्क राहा. 


वृश्चिक रास आजचे कौटुंबिक जीवन


आज तुम्हाला तुमच्या वाणीवर संतुलन ठेवावं लागेल. रागाच्या भरात तोंडून अपशब्द येणार नाहीत आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. अन्यथा, नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आज तुम्हाला वडील आणि मोठ्या भावाचे सहकार्य मिळेल. संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर चांगला जाईल. 


आज वृश्चिक राशीचे आरोग्य


आज वृश्चिक राशीचा दिवस चांगला जाईल. पण, बदलत्या हवामानामुळे सुस्तपणा आणि थकवा जाणवेल. जर बीपी आणि ब्लडप्रेशरशी संबंधित काही समस्या असतील तर काळजी घ्या आणि भरपूर पाणी घ्या.


वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 


आज वृश्चिक राशीच्या लोकांना दशरथ रचित शनि स्तोत्राचे पठण करणे लाभदायक ठरेल. आज उडीद डाळीची खिचडी खा आणि गरिबांना अन्नदानही करा. 


वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 


वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 24 June 2023 : मेष, सिंह, मकरसह 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य