Saturn Chandra Grahan 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये शनीला कर्मफळदाता ग्रह म्हटलं जातं. कारण शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यानुसार, आकाशात दिसणारा चंद्र आपल्या कक्षेत शनीला पूर्णपणे झाकून ठेवणार आहे. तब्बल 18 वर्षांनतर भारतात हा दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. भारतात 24-25 जुलैच्या मध्यरात्री हे चंद्रग्रहण दिसणार आहे. 


या काळात शनी चंद्राच्या मागे लपणार आहे आणि चंद्राच्या कडेवरून शनीचं एक वलय तयार होणार आहे. या अद्भूत योगाचं संशोधन खगोलशास्त्रात संशोधन करत आहेत. 


'ही' असणार शनी चंद्रग्रहणाची वेळ 


खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार, 24 जुलै रोजी रात्री 01.30 वाजता आकाशात हे दृश्य पाहायला मिळणार आहे. रात्री 01 वाजून 44 मिनिटांनी चंद्र शनीला आपल्या मागे पूर्णपणे झाकणार असल्याची माहिती आहे. तर, रात्री 02 वाजून 25 मिनिटांनी शनी ग्रह चंद्राच्या कक्षेतून बाहेर निघताना दिसेल असा अंदाज लावण्यात येतोय. 


'या' देशांत दिसणार शनी चंद्रग्रहण 


हे अद्भूत शनी चंद्रग्रहण भारतात तर दिसणारच आहे. पण, भारता व्यतिरिक्त श्रीलंका, म्यानमार, चीन आणि जपानमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. शनीच्या चंद्रग्रहणाच्या या घटनेला 'लूनार ऑकल्टेशन ऑफ सॅटर्न' असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या गतीने चाललेले दोन ग्रह जेव्हा आपला मार्ग बदलतात तेव्हा शनी ग्रह चंद्राच्या मागून उगवतो. यामध्ये सर्वात आधी शनीचे वलय स्पष्ट दिसतात. हा अद्भूत योग खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी फार उत्सुकतेचा विषय आहे. 


तीन महिन्यांनंतर पुन्हा दिसणार हे दृश्य 


संशोधकांच्या म्हणण्यानुसार, शनी चंद्रग्रहणाचं हे दृश्य फक्त दुर्बिणीने दिसू शकते. तसेच, तीन महिन्यांनंतर हे दृश्य पुन्हा भारतात दिसणार आहे. तसेच, खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार, जर जुलै महिन्यात हे चंद्रग्रहण दिसलं नाही तर 14 ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज आयुष्मान योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; वृश्चिकसह 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद