Saturday Remedies : आठवड्यातील शनिवारचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. या दिवशी शनीची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख कमी होतं. वैदिक ज्योतिषात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनीला न्याय देवता म्हटलं जातं, कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फळ देतो. शनि हा अत्यंत संथ गतीने फिरणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम देखील व्यक्तीवर दीर्घकाळ राहतो.


शनीशी संबंधित उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात. शनिवारी हे उपाय करणं अधिक प्रभावी ठरतं. परंतु, सर्वांनाच प्रत्येक शनिवारी हे उपाय करणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही फक्त एक शनिवार दिलेला उपाय केल्यास तुम्हाला निश्चितच त्याचं योग्य फळ मिळेल. हे उपाय नेमके कोणते? जाणून घ्या.


फक्त एका शनिवारी करा हा उपाय (Saturday Remedies)


साहित्य : तांब्याचा कलश, पाणी, खडीसाखर, काळा धागा, दिवा


प्रथम एक तांब्याचा कलश घ्या, त्यात खडीसाखर टाका. एका पिंपळाच्या झाडाखील जा, त्या झाडाला तुम्ही आणलेलं खडीसाखरेचं पाणी घाला. सोबत आणलेला काळा धागा पिंपळाच्या झाडाला 5 वेळा गुंडाळा. उरलेला काळा धागा हा अजिबात तोडू नका किंवा घरीही घेऊन जाऊ नका. पिंपळाच्या झाडाला असलेल्या इतर धाग्यांना तो अडकवून द्या. पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारताना  'ॐ शं शनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करा. यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमंताचं आणि शनीचं नामस्मरण करा.


शनिवारी शनीची पूजा का करावी?


शनीच्या शुभ प्रभाव असल्यास माणूस यशाकडे वाटचाल करत राहतो. पण हेच जर, शनि दोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेलं कामही बिघडतं. तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळे शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात.


शनिदेवाचे मुख्य मंत्र


शनिदेवाची पूजा करताना खालील मंत्रांचा जप करणं शुभ मानलं जातं.


शनि गायत्री मंत्र


ॐ शनैश्चराय विदमहे छायापुत्राय धीमहि ।


शनि बीज मंत्र


ॐ प्रां प्रीं प्रों स: शनैश्चराय नमः ।।


शनि स्तोत्र


ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ।।


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार