Sarva Pitri Amavasya 2024 : हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला (Sarva Pitri Amavasya 2024) विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांना पितरांची निश्चित तारीख माहीत नसते, असे लोक सर्वपित्री अमावस्येला पितरांचं श्राद्ध घालतात. ज्यांना 16 दिवसांच्या पितृ पक्षाच्या काळात श्राद्ध घालता आलं नाही, असे लोक देखील र्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालतात. यंदा सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबरला आहे, याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी पित्र करावे की नाही? जाणून घेऊया.
यंदा पितृ पक्षावर सूर्यग्रहणाचं सावट
यंदा पितृपक्षावर चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणांचं सावट आहे. यात 17 सप्टेंबरला चंद्रग्रहण होऊन गेलं, तर 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होईल. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ मानला जाणार नाही.
सूर्यग्रहणाचा भारतावर परिणाम नाही, पित्र करता येतील
शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे याचा सूतक काळ देखील भारतात मान्य होणार नाही. तसेच, या दिवशी व्यक्तीद्वारा करण्यात आलेले कर्म धर्म आणि शुभ कार्याचा कोणताच दोष लागणार नाही. तर, व्यक्तीद्वारा करण्यात आलेल्या धर्म कर्म आणि शुभ कार्याचे शुभ फळ प्राप्त होईल. त्यामुळे या काळात तुम्ही पित्र करू शकतात.
सूर्यग्रहणाची वेळ
ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण रात्री 9.13 पासून सुरू होणार आहे. हे सूर्य ग्रहण 3 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, सूतक काळाचा प्रारंभ 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.13 वाजता सुरु होईल. 2024 चं हे सूर्य ग्रहण भारताच्या वेळेनुसार, रात्रीच्या वेळी होणार आहे. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही.
सर्वपित्री अमावस्या तिथी आणि मुहूर्त (Sarva Pitri Amavasya 2024 Date)
पंचांगानुसार, भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी, म्हणजे सर्वपित्री अमावस्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 09 वाजून 39 मिनिटांनी सुरू होईल. तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्याने मान्यतेनुसार, 02 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केलं जाईल. श्राद्ध विधीसाठी दुपारची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :