Sankashti Chaturthi 2024 : आज वैशाख महिन्यातील शुक्ल तिथी म्हणजेच संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज चार शुभ योगांमध्ये साजरी होणार आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व संकटांपासून वाचण्यासाठी आणि श्रीगणेशाला (Lord Ganesha) प्रसन्न करण्यासाठी पाळले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास मनातील इच्छाही पूर्ण होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. तसेच, आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने 4 शुभ योग जुळून आले आहेत. याचा काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे.


एकदंत संकष्ट चतुर्थीची चंद्रोदय वेळ (Sankashti Chaturthi 2024 Time)


संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी चंद्र दिसण्याचे महत्त्व आहे. आज म्हणजेच 26 मे रोजी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार चतुर्थी तिथी संध्याकाळी 6.06 वाजता सुरू होईल, जी 27 मे रोजी संध्याकाळी 4.53 पर्यंत चालेल. संकष्ट चतुर्थीला रात्री 09.41 वाजता चंद्रोदय होईल. 


एकदंत संकष्ट चतुर्थी 2024 पूजा मुहूर्त (Sankashti Chaturthi 2024 Puja Muhurta)


ज्येष्ठ महिन्यातील एकदंत संकष्ट चतुर्थी पूजेसाठी 2 शुभ मुहूर्त आहेत. 26 मे रोजी सकाळी 7:08 ते दुपारी 12:18 पर्यंत पहिला शुभ मुहूर्त आणि दुसरा शुभ मुहूर्त 7:12 ते रात्री 9:45 पर्यंत असणार आहे. संकष्ट चतुर्थीची पूजा रात्री चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यावरच पूर्ण मानली जाते. यानंतरच उपवास सोडावा.  


एकदंत संकष्ट चतुर्थीला 4 शुभ योग (Sankashti Chaturthi 2024 Shubh Yog)


ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच संकष्ट चतुर्थीला साध्ययोग, भद्र योग आणि शिव वास योग असे अतिशय शुभ योग आहेत. या योगांमध्ये गणेशाची आराधना केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळेल. तसेच तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील. 


संकष्ट चतुर्थीला 'या' राशींचे भाग्य उजळेल (Lucky Zodiac Signs)


आज एकदंत संकष्ट चतुर्थीला तयार होत असलेला शुभ योग 5 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आहे. हा शुभ योग मेष, वृषभ, मिथुन, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला लाभ देईल. श्रीगणेशाच्या कृपेने या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. त्यांना आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायात वाढ होईल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील पण त्या चांगल्या प्रकारे हाताळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी; चंद्रोदयाची वेळ, शुभ मुहूर्त आणि अचूक पूजा पद्धत जाणून घ्या