Sankashti Chaturthi 2024 : हिंदू नववर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. हिंदू कॅलेंडरनुसार आज (27 एप्रिल) रोजी संकष्ट चतुर्थी आहे. नवीन वर्षातील ही पहिलीच संकष्टी आहे त्यामुळे ही चतुर्थी अधिक खास आहे. संकष्ट चतुर्थीला गणेशाची पूजा आणि उपवस करण्याची परंपरा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार चतुर्थी तिथीला गणरायाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दु:खापासून मुक्ती मिळते. याशिवाय उत्पन्न आणि सौभाग्य वाढते असे म्हणतात. तुम्हाला जर गणपती बाप्पाला प्रसन्न करायचं असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करा. पण, संकष्ट चतुर्थीची शुभ वेळ काय? त्याचं महत्त्व काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
संकष्ट चतुर्थी कधी असते? (Sankashti Chaturthi Date)
संकष्ट चतुर्थीला वैशाखची संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात. या व्रतामध्ये रात्री चंद्राची पूजा करण्याबरोबरच अर्घ्यही दिले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत कर्मकांडानुसार पाळणाऱ्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. यंदा संकष्ट चतुर्थी 27 एप्रिल रोजी म्हणजेच (आज) आहे. येत आहे.
संकष्ट चतुर्थी शुभ वेळ (Sankashti Chaturthi Muhurta)
पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 27 एप्रिल रोजी सकाळी 8:17 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 28 एप्रिल रोजी सकाळी 8:21 वाजता समाप्त होईल. अशा प्रकारे हे संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. संकष्ट चतुर्थी तिथीला चंद्र पाहण्याचीही परंपरा आहे. या तारखेला चंद्रदर्शनाची वेळ रात्री 10.23 आहे.
संकष्ट चतुर्थीचे महत्व (Sankashti Chaturthi Importance)
संकष्ट चतुर्थी दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे पुत्र गणेशाची पूजा केली जाते. तसेच शुभ कार्यात यश मिळविण्यासाठी उपवास केला जातो. संकष्ट चतुर्थी व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात शुभ गोष्टी घडतात. तसेच, सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: