Sankashti Chaturthi 2022 : आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) साजरी करण्याची परंपरा आहे. या महिन्यातील संकष्ट चतुर्थी आज म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच, या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या.
संकष्टी चतुर्थीचे महत्व (Sankashti Chaturthi Importance 2022) :
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते आणि गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मात, भगवान गणेशाला प्रथम पूज्य देवाचा दर्जा देण्यात आला आहे आणि प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भाविकांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि या व्रतामुळे सर्व चतुर्थीच्या उपवासाचे फळ मिळते, असा विश्वास आहे.
संकष्ट चतुर्थी : गुरुवार, 13 ऑक्टोबर 2022
- निज अश्विन वद्य चतुर्थी प्रारंभ : 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजून 37 मिनिटे.
- निज अश्विन वद्य चतुर्थी समाप्ती : 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजून 25 मिनिटे.
विविध शहरांतील चंद्रोदयाची वेळ (Chandrodaya Time In States) :
संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2022) :
संकष्टी चतुर्थीला गणपतीला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. या दिवशी सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर एका चौरंगावर गणपतीची स्थापना करावी. गणपतीची पूजा करावी. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवावा. दिवसभर उपवास केल्यानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला नैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे. चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे निज आश्विन वद्य संकष्ट चतुर्थी व्रत गुरुवार, 13 ऑक्टोबर 2022 रोजी करावे, असे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :