Salman Khan Bracelet : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा आपल्या अभिनयामुळे, स्टायलिंगमुळे आणि अनेक वादविवादांमुळे सतत चर्चेत असतो. त्याचबरोबर, बॉलिवूडच्या या सुपरस्टारच्या ब्रेसलेटने देखील अनेकांचं लभ वेधून घेतलं आहे. सलमान जिथे जातो तिथे त्याच्या हातात हे ब्रेसलेट नेहमीच असतं. सलमानच्या या ब्रेसलेटमध्ये निळ्या रंगाचं रत्न आहे.
खरंतर, सलमानला हे ब्रेसलेट त्याचे वडील सलीम खान यांनी त्याला गिफ्ट दिलं आहे. सलमान खान स्वत: या ब्रेसलेटला लकी मानतो. तसेच, सलमानचे फॅन्स देखील त्याच्यासारखंच ब्रेसलेट हातात घातलेले दिसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ब्रेसलेटमध्ये जे रत्न आहे त्याचा नेमका अर्थ काय? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, सलमान खानच्या हातातील ब्रेसलेटमध्ये जो निळ्या रंगाचा खडा आहे तो एक रत्न आहे. फिरोजा असं या रत्नाचं नाव आहे. फिरोजा रत्नाचा वापर फार पूर्वीपासून अंगठी, ब्रेसलेट, ताविज आणि दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, फिरोजा रत्न हा गुरु ग्रहाचा रत्न मानला जातो. हे रत्न घातल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते. तसेच, अनेकांसाठी हे रत्न गुडलक म्हणून देखील आहे.
खरंच वाईट नजरेपासून सुटका होते?
फिरोजा रत्न आधात्मिकतेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण आहे. हे रत्न वाईट नजरेपासून तुमची सुटका करते अशी मान्यता आहे. या रत्नाच्या बाबतीत म्हणतात की, हे रत्न परिधान केल्याने आपल्या आजूबाजूची निगेटिव्हीटी दूर होते. या रत्नाचा रंग निळा असतो.
फिरोजा ग्रहाचा संबंध कोणत्या ग्रहाशी आहे?
फिरोजा ग्रह प्रामुख्याने बुध आणि केतू अशा दोन ग्रहांशी संबंधित आहे. बुध ग्रहाला शुभ्रतेचं प्रतीक मानलं जाते. तर, केतू ग्रह अशुभ्रतेचं प्रतीक मानला जातो. फिरोजा रत्न घालण्याचा अर्थ चांगल्या कामाच्या प्रती प्रेरित होणं, आत्मविश्वास निर्माण करणं असा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :